लोकवीर टाईम्स दणका …! सोनईतील वाढती गर्दी लक्षात घेवून १७ मे पर्यंत लाॅकडाऊन जाहीर

 

सोनई ( प्रतिनिधी ) :- लॉक डाउन काळात सवलत दिल्यानंतर सोनई शहरातील अनेक दुकाने खुली झाली होते मात्र लोकांनी कुठल्याही सोशल टेस्टिंग न पाळता दुकानांनी गर्दी केली होती हे चित्र पाहून लोकवीर टाइम्स’ने दोन दिवसापूर्वी , “सोनईकरांना कोणीतरी आवरारे असे म्हणण्याची वेळ ! सोनईमध्ये व्यावसायीकाबरोबर नागरिकांकडुन सोशल डिस्टीटींगचे उल्लंघन ” या माथाळ्याखीली बातमी प्रसिद्ध केली होती या बातमीची दखल घेउन प्रशासनाने अखेर आज पासून १७ मे पर्यंत पुन्हा लाॅकडाऊन करण्यात आले आहे.
सोनई व परीसरातील चांगली स्थिती लक्षात घेवून मागील आठवड्यात सलून व चहाचे हाॅटेल वगळता सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली होती.
बसस्थानक,शिवाजी महाराज रस्ता,नवीपेठ व महावीर पेठेत खरेदीसाठी गर्दी उसळली होती.राहुरी व श्रीरामपुर तालुक्यातील अनेकांन कापड खरेदीसाठी गर्दी केली होती. ग्रामपंचायत व पोलिस यंत्रणेने सर्वांना सुचना देवूनही दुकानात व रस्त्यावर वाढती गर्दी लक्षात घेवून आज पुन्हा सर्व व्यवहार बंद करण्यात आले.
दोन दिवसापासून सोनईत एक कोरोनाचा रुग्ण नगरला नेल्याची अफवा आहे.आजपासून पुन्हा बंदचा
निर्णय झाल्याने अफवा अधिकच वाढली आहे.
गाव व परीसरात असा कुठलाच रुग्ण नसुन येथील लाॅकडाऊन फक्त गर्दीचा नियम मोडल्याने लावण्यात आला आहे.असे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. राजेंद्र कसबे यांनी सांगितले.सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी गावातील बंदोबस्त वाढविला आहे.

Check Also

जामखेड येथील कोरोना बाधीत रुग्ण झाला कोरोनामुक्त, आज मिळाला ‘डिस्चार्ज’

🔊 Listen to this   अहमदनगर ( प्रतिनिधी ) :– जामखेड येथील कोरोना बाधीत रुग्ण …