नेवासा ( प्रतिनिधी ) :- २२ मार्चपासून लोक डाऊन मुळे नेवासा शहरातील बंद असणारी काही दुकाने उद्या 14 मे पासून काही अटीवर खुली करण्यात येणार असल्याची माहिती नगरपंचायत चे मुख्याधिकारी समीर शेख यांनी एका पत्रकाद्वारे दिली. यामुळे नेवासा शहरासाठी दिलासादायक बातमी आहे.
नेवासा शहरातील काही दुकाने उद्यापासून सुरू होणर असुन त्यात उजव्या – डाव्या बाजूची दुकाने दिवसाआड सुरू करण्याचा निर्णय आज १३ मे रोजी जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नेवासा शहरात होणारी गर्दी रोखण्यासाठी व शासनाच्या आदेशानुसार दुकाने सुरू ठेवण्याबाबत नगरपंचायत च्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीत नियोजन करण्यात आले. त्यानुसार अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त दुकाने ठरविण्यात आलेल्या वारांप्रमाणे, तर अत्यावश्यक सेवेतील दुकाने रविवार वगळून सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहे. तर रविवारचा आठवडा बाजार लॉकडाऊन संपेपर्यंत पूर्णत: बंदच राहणार आहे. रविवारच्या दिवशी हॉस्पिटल व मेडिकल सोडून सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच हाँटेल , रेस्टारट , केशकर्तनालय , ब्युटी पार्लर, स्पा, पान स्टॉल, चहा/कॉफीची दुकाने , रसवंती/शितपेय , भैळ , वडापाव व इतर खादयपदार्थ
विकणारे दुकाने शासकीय आदेश येण्यापर्यत बंद राहणार आहे. प्रत्येक दुकानदाराने नियमांचे पालन करावे अन्यथा कारवाई करणार असल्याचे नगरपंचायत चे मुख्याधिकारी समीर शेख यांनी सांगितले.
Check Also
२७ मे रोजी शारीरिक अंतर पाळून सर्वत्र निषेध व प्रतिकार दिन पाळणार – किसान सभा
🔊 Listen to this मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ):– मोदी सरकारच्या सातत्याच्या दुर्लक्षाविरुद्ध शेतकऱ्यांची …