मुलाचा खून करणाऱ्या आई व तिच्या दोन साथीदारांना अटक ; अनैतिक संबंधात मुलगा ठरत होताअडसर

 

नेवासा ( प्रतिनिधी ):-  दि ५ जूलै रोजी रात्री वरखेड ता नेवासा येथील अल्पवयीन मुलगा सोहम उत्तम खिलारे वय ८ वर्षे याचा खुन झाल्याबाबत पोलिस पाटील संतोष भागीरथ घुंगासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ६ जुलै रोजी नेवासा पोलिस स्टेशन ला गु र नं ४८२/२०२१ भा.द.वि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हयात मयत मुलाची आई सिमा उत्तम खिलारे वय २७ वर्षे रा वरखेड ता नेवासा हिस अटक करण्यात आली होती पोलिस कस्टडी दरम्यान तीने दिलेल्या कबुलीवरुन अल्पवयीन मुलाच्या खुनाबाबत मयत मुलाची आई सिमा उत्तम खिलारे वय २७ वर्षे हिने चौकशी दरम्यान सदर दिवशी प्रात : विधीचा बहाणा करुन खुन झालेल्या ठिकाणाकडे जावुन सुनिल किसन माळी व विष्णु हरिभाऊ कुंढारे वय ३२ वर्षे वरील सर्व रा वरखेड यांचेशी बोलत असताना पाठीमागे आलेला मयत मुलगा म्हणाला कि- मी तुमचे नाव माझ्या वडीलांकडे सांगुन देईन त्यावरुन आरोपी सुनिल माळी याने त्यास चापटीने मारहाण केली व आरोपी सिमा खिलारे हीस सदर ठिकाणावरुन निघुन जाणेस सांगितले . आरोपी सुनील माळी व हरिभाऊ कुंढारे यांनी मुलाच्या डोक्यात दगड मारुन जिवे ठार मारले आहे अशी कबुली अटक आरोपींनी दिली आहे सदरची कामगीरी ही मा पोलीस अधिक्षक मनोज पाटील ,अहमदनगर , अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे , उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे सो यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि.विजय करे , सपोनि विजय ठाकुर , पोसई बी एच दाते , पोसई एस व्ही भाटेवाल , पोना राहुल यादव , पोना महेश कचे , शाम गुंजाळ , वसीम इनामदार यांनी केली आहे

Check Also

मंगळसूत्र चोरट्यास श्रीगोंदा पोलिसांनी आढळगाव येथे सापळा लावून पकडले. ; मंगळसूत्र हस्तगत.

🔊 Listen to this श्रीगोंदा ( प्रतिनिधी ):- सुमारे दोन महिन्यापूर्वी हिरडगाव येथून रात्रीच्या वेळी …