आपले मत नोंदवा
do_shortcode(‘[Total_Soft_Poll id=”13″]’);?>
आपले मत नोंदवा
नेवासा (प्रतिनीधी):- माजी आमदार शंकरराव गडाख यांना तालुक्याचा विकास करण्यासाठी नाही तर राजकारण करण्यासाठी सत्ता पाहिजे आसल्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आज सांगितले. निंभारी (ता.नेवासे)येथे निंभारी-वांजुळपोई रोडवरील सांगळे वस्ती वरील डांबरीकरणाच्या भुमिपुजन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रगतीशिल शेतकरी गोपाळराव जाधव हे होते.
आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी गडांखावर चौफेर टिका करुन चांगलाच समाचार घेतला. गडाख यांच्या कडे आसणाऱ्या विविध संस्था, शैक्षणिक संस्था चालविण्यासाठी वेळ जातो त्याना सामन्यांचे प्रश्न तसेच तालुक्यातील विकासासाठी कधी वेळ मिळेल. तालुक्यात विकास काय आसतो हे आपण पाच वर्षात जनतेने पाहिले. मुळानदीवरील बंधारे सातत्याने भरून दिले आसुन यावषिँ हि बंधारे पुर्ण क्षमतेने दोनदा नाही तर तीनदा भरुन मिळणार आसल्याचे सांगितले. तसेच डिवाय तीन पाटचारी रस्ता लवकरच डांबरीकरण तसेच पाटपाण्याचाही प्रश्न लवकरच मार्गी लागणार आसल्याचे सांगितले.यावेळी सुभाष पवार,मनोज पारखे,प्रफुल्ल जाधव,किशोर जंगले,आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी दत्तात्रय घोलप,अशोक टेमक, पोपट सांगळे,अनिल सांगळे,पाराजी गुडधे, शिवाजी जाधव,लक्ष्मण माकोणे, किशोर सांगळे,दिलीप सांगळे,रविंद्र सांगळे,प्रमोद कुमावत,विश्वनाथ पवार, राऊसाहेब घुमरे,मोहन गायकवाड, संतोष पाटील , गंगाधर पवार मोहन फुलसौंदर, रविंद्र लाटे,नवनाथ गोसावी बाबासाहेब मोरे पांडुरंग मंडलिक आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचालन अण्णासाहेब जाधव प्रस्ताविक पाराजी शिरसाट आभार जनार्दन पवार यांनी मानले.
नेवासा – तालुक्यातील निंभारी येथे विविध विकास कामाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना आमदार बाळासाहेब मुरकुटे तसेच दत्तात्रय घोलप,अशोक टेमक सुभाष पवार, लक्ष्मण माकोणे आदी मान्यवर उपस्थित होते.