मुळाच्या पाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर: लोकप्रतिनिधी गप्प का? पहा व्हिडिओ!!!

आपले मत नोंदवा

do_shortcode(‘[Total_Soft_Poll id=”13″]’);?>

कुकाणा- भानसहिवरा येथे रस्ता रोको आंदोलन

नेवासा (प्रतिनिधी):- नेवासा तालुक्यात तीन महिण्यापासून पावसाने दांडी मारल्याने पिके पाण्यावाचून जळत आहे. सध्या मुळा धरणातून शेतीसाठी आवर्तन सुरु असून त्या आवर्तनातून साठवण तलाव भरुण दयावे या मागणी साठी अहमदनगर जिल्हातील नेवासा-शेवगाव महामार्ग शेतकऱ्यांनी रस्तारोको आंदोलन केले.यावेळी लोकप्रतिनिधीच्या भुमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली.

कुकाणा, भानसहिवरे गावातील शेतकरी पाण्यासाठी आक्रमक झाले आहे. पाटाला पाणी येवून तीन आठवडे झाले तरीही पाणी मिळत नसल्याने शेतकरी संतापले आहे. लोकप्रतिनिधीच्या ढिसाळ नियोजनाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून तरीही लोकप्रतिनिधी गप्प का ? असा सवाल शेतकरी करत आहेत.
रास्ता रोको आंदोलना दरम्यान मुळा पाटबंधारे विभागाचे अधिकारी दुशिंग व नेवासा पोलीस स्टेनशचे पोलीस निरिक्षक रणजित डेरे यांनी आंदोलकांना पाणी सोडण्याचे लेखी अश्वासन दिले, त्यानंतर रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले, यावेळी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, पोलीस निरिक्षक रणजित डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Check Also

नेवासा तालुकाध्यक्ष माळवदे यांच्या राहत्या घराची झाडाझडती घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करा. ; अन्यथा जिल्हाभरात आंदोलन करू-काँग्रेस जिल्हाअध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांची पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार यांच्या कडे मागणी

🔊 Listen to this नेवासा ( प्रतिनिधी ) :- नेवासा तालुका काँगेस कमिटीचे अध्यक्ष श्री. …