श्रीरामपूर तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा उत्साह प्रारंभ

 

श्रीरामपूर(प्रतिनिधी):- हरेगाव येथील संत तेरेजा गर्ल्स हायस्कूल व जूनियर कॉलेज मध्ये शालेय कबड्डी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर स्पर्धा दिनांक २९ऑगस्ट ते ३१ऑगस्ट पर्यन्त रंगणार आहे.या शालेय स्पर्धात १४/१७/१९ वर्षाखालील ८५ संघांनी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धाचे उद्घाटन संत तेरेजा बॉईज हायस्कूल व जूनियर कॉलेज हरेगावचे प्राचार्य फा डॉमनीक,मुख्याध्यापिका सिस्टर ज्योती गजभिव,मुख्याद्यापक पारद्ये सर,सौ उर्मिला पुजारी अदीचा हस्ते करण्यात आले.या वेळी तालुका क्रीडा समिती अध्यक्ष श्री सुरांजन साळवे, उपाध्यक्ष श्री काकासाहेब चौधरी,सचिव श्री नितिन बलराज, आंतराष्ट्रीय व्हॉलीबॉल पंच श्री आदिनाथ कोल्हे,श्री प्रशांत होन,श्री शिरोळे सर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमचे सूत्रसंचालन श्री दिलीप कांबळे यांनी केले तर आभार श्री सुरांजन साळवे यांनी व्यक्त केला.