Breaking News

बालाजी देडगाव येथे ४९ वा अखंड हरिनाम सप्ताह

बालाजी देडगाव -(इंनुसभाई पठाण) बालाजी देडगाव येथे भगवंत स्वयंभू बालाजी रायचा ४९वा अखंड हरिनाम सप्ताह उभा राहिला आहे.
हा सप्ताह ऐतिहासिक कालीन असून या बालाजी रायची खूप खूप मोठी वेगळी परंपरा आहे बालाजी रायचे खुप जुने ऐतिहासिक कालीन मंदिर आहे या गावात स्वयंभू बालाजीची मूर्ती आहे अशी शोभणीय मूर्ती कुठेही बघायला मिळत नाही ही मूर्ती एक चमत्कारिक मूर्ती आहे आज या सप्ताहाच्या निमित्ताने अनेक महाराष्ट्रतुन भाविक जमा होतात .सप्ताच्या वेळी नामवंत महाराजांची कीर्तने होतात व दररोज सायंकाळी सहा वाजता आरती होऊन मोठया प्रमाणात पंगती होतात पंगतीत खास करून डांगर भोपळा भाजी ही प्रसिद्ध आहे. या ठिकाणी हजारो भाविक अन्नदानाचा लाभ घेतात. व दसरा निमित्ताने बालाजीचे मूर्तीचे गावात मिरवणूक काढण्यात येत असते या बालाजीच्या पालखीतून बालाजीची स्वयंभू मूर्ती गावभर मिरवली जाते व मोठा उत्सव साजरा केला जातो या मध्ये सर्व जाती धर्मियांचे लोक आनंद साजरा करतात या मिरवणूककित अनेक वाद्य ढोलताशांच्या आवाजात लेझीम खेळली जाते फटाक्याच्या आतषबाजीत व हरी नामाच्या गजरात टाळाच्या आवाजात अनेक वारकऱ्यांच्या जयघोषात मिरवणूक काढण्यात येत असते व पारंपरिक पद्धतीने धनगर समाजाचा खेळ खेळला जातो .व दसऱ्याच्या पाच दिवसानंतर मोठी यात्रा महोत्सव साजरा केला जातो परिसरातील मोठी गर्दी उपस्थित राहते हजऱ्या ,तमाशा ,खेळण्या, यात्रेतील मोठाली रहाटे, अनेक वेगळ्या पद्धतीने यात्रा महोत्सव साजरा केला जातो व नामवंत हंगामा भरवला जातो या गावात महाराष्ट्र तुन मल्ल येत असतात या पद्धतीने या गावाचा यात्रा उत्सव साजरा केला जातो.