नेवासा( प्रतिनिधी ) :- नेवासाफाटा येथील आरटीओ ज्ञानदेव देवखिळे व नेवासा होमगार्डचे तालुका समादेशक पत्रकार बाळासाहेब देवखिळे यांचे वडील प्रगतशील शेतकरी श्री बाबुराव संभू देवखिळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एकावन्न हजारांची मदत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे माजी मंत्री बबनराव पाचपूते यांच्या उपस्थितीत धनादेशाच्या रूपाने सुपूर्त केली.
नेवासाफाटा येथील प्रगतशील शेतकरी श्री बाबुराव देवखिळे हे सदया श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे स्थायीक आहेत वारकरी संप्रदायातील सेवेकरी असलेले ९३ वर्षीय श्री बाबुराव देवखिळे हे दरवर्षी आषाढी पायी वारीतील वारकऱ्यांना एकावन्न हजार रुपयांची पंगत देतात मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर ते पंगत देऊ शकले नाही म्हणून त्यांनी आपल्या ९३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधी कोविड १९ ला देण्याचे ठरविले त्यानुसार वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी एकावन्न हजार रुपयांचा हा निधी माजी मंत्री बबनराव पाचपूते यांच्या उपस्थितीत खासदार डॉ.सूजयदादा विखे पाटील यांच्याकडे सुपूर्त केला.मागील वर्षी नेवासाफाटा येथे झालेल्या संतपूजन सोहळयात गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते अकरा संत महंतांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यातील योगदानाबद्दल प्रगतशील शेतकरी बाबुराव देवखिळे यांचा गौरव करण्यात आला होता.
यावेळी देवखिळे परिवारातील सदस्य प्रगतशील शेतकरी बापूराव देवखिळे, उद्योजक नारायण देवखिळे उपस्थित होते.कोरोनाच्या या संकटात राष्ट्रीय कर्तव्य समजून सर्वांनी पंतप्रधान सहायता निधी व मुख्यमंत्री सहायता निधी साठी मदत करावी असे आवाहन यावेळी खासदार डॉ.सूजयदादा विखे पाटील यांनी जनतेला केले आहे.