Breaking News

शेत आणि शेततळ्यातील पाण्याचे होणारे बाष्पीभवन कमी करण्याची गरज-जलमित्र सुखदेव फुलारी

 

अहमदनगर ( प्रतिनिधी ) :- पाणी हेच जीवन आहे मग ते माणसंच असो की पशु-पक्षी वा पिकांच.सर्वांनाच पाण्याची गरज असते.त्यामुळे पाण्याच्या थेंब न थेंबाचा काटकसरीने वापर होणे आवश्यक आहे.शेतातील पाणी व्यवस्थापन करतांना शेतातील व शेततळ्यातील पाण्याचे होणारे बाष्पीभवन कमी करणे गरजेचे आहे असे मत जलमित्र सुखदेव फुलारी यांनी व्यक्त केले.
मिशन ऑरगॅनिक अँड हेल्दी इंडिया आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन डिजिटल उन्हाळी सेंद्रिय शेती परिषद 2020 मध्ये ”उत्तम जलव्यवस्थापन-काळाची गरज” या विषयावर बोलतांना जलमित्र सुखदेव फुलारी पुढे म्हणाले,शेतीमध्ये पर ड्रॉप मोर क्रॉप ही संकल्पना रुजू झालेली आहे.उपलब्ध पाण्याच्या थेंबा थेंबाचा काटकसरीने वापर करून अधिकाधिक उत्पादन घेणे ही या मागची भूमिका आहे.शेती करतांना जमिनीची मशागत,माती परीक्षण,खत/पीक व्यवस्थापन या बरोबरच पाणी व्यवस्थापन ही अत्यन्त महत्वाची बाब आहे.योग्य पाणी व्यवस्थापन नसेल तर इतर सर्व बाबी व्यर्थ ठरतात. त्यामुळे पारंपरिक फ्लो पद्धती ऐवजी ठिबक सिंचन वा तुषार सिंचनाचा वापर करून पिकाला पाणी दिल्यास पाण्याची ही बचत होते आणि सुपीक माती व खते वाहून जात नाही.
शेतीच्या पाण्याचे व्यवस्थापन करतांना शेतात पिकाला दिलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये यासाठी पचराट,पालापाचोळा,विविध पिकांचे भुसा यांचा वापर करून आच्छादन करणे, मल्चिंग पेपरचा वापर करावा.
शेतीसाठी संरक्षित पाणीसाठा उपलब्ध व्हावा यासाठी शेततळे केली जातात.मात्र उन्हाळ्यात शेततळ्यातील पाण्याचे 50 टक्के बाष्पीभवन होत असते ते थांबविण्यासाठी जास्त लांबी-रुंदीचे शेततळे करण्याऐवजी जास्त खोलीचे शेततळे केले पाहिजे.सुरक्षित अंतर ठेवून शेततळ्या भोवती झाडांची ताटी निर्माण केली पाहिजे. शेततळ्यातील पाण्यावर जैविक रसायनाचा वापर करून पाण्यावर अस्तरीकरण केल्यास पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते.
पावसाळ्यापूर्वी आपल्या शेतात बांधबंदिस्ती, कंपार्टमेंट बंडिंग यासाखरे जलसंधारणाचे उपचार करून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब शेतातच जिरविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.पावसाचे पाण्याने शेतातील विहीर-बोअरचे जल पुनर्भरण करावे.त्यामुळे आपली स्वतःची वॉटर बँक तयार होऊ शकेल आणि टंचाईच्या काळात पाणी उपलब्ध होऊ शकेल.
या परिषदेत श्रीमती कल्पना वानखेडे,अमरावती (सेंद्रिय शेती-काळाची गरज),डॉ.स्वप्नील वाघ,औरंगाबाद(मृदा संरक्षण व परीक्षण),धर्मेश कावळे,औरंगाबाद(कमी खर्चात जास्त उत्पादन),सुनिल बोरुडे,कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर(शेती विकासातील व्यवस्थापकीय कौशल्य), डॉ.दीपक बोरनारे,कृषी महाविद्यालय औरंगाबाद(माती परीक्षण फायदे आणि महत्व), प्रदीप काकडे,नांदेड(सेंद्रिय उत्पादने फवारणी उपयोग), नारायण लोळगे,लोणी(कृषी विकासातील नफा वाटा व शासकीय योजना), डॉ.पुरुषोत्तम हेंद्रे, कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर(फळबाग लागवड-सल्ला व मार्गदर्शन), काकासाहेब सुकासे, औरंगाबाद(खरीप पीक लागवड-सल्ला व मार्गदर्शन), डॉ.किरण राऊत,जालना(सेंद्रिय उत्पादने- सिंचनासाठीचा उपयोग), राहूल कहाटे,पैठण(रोग-कीड व्यवस्थापन)
यांनी ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
सौरभ झालटे,धर्मेश कावळे,अमोल झालटे, डॉ.दत्तात्रय महंत, चंद्रकांत तायडे यांनी या डिजिटल परिषदेचे आयोजन केले होते.राज्यभरातील 90 हुन अधिक शेतकरी सहभागी झाले होते.
सागर झालटे यांनी परिषदेचे सूत्र संचालन केले.

Check Also

डहाणू भाजप कार्यालयावर सोशल डिस्टन्स चा फज्जा

🔊 Listen to this पालघर / डहाणू. (प्रतिनिधी) :– डहाणू येथील भारतीय जनता पक्षाचे जनसंपर्क …