
नेवासा ( प्रतिनिधी ): – रमजानच्या पवित्र महिन्यात चंद्र दर्शन होईपर्यंत रोज उपवास केले जातात. सुर्य उगवण्यापुर्वी अन्नाचे ग्रहण करायचे आणि संपुर्ण दिवस सुर्यास्त होईपर्यंत उपवास पाळायचा. सुर्यास्त झाल्यानंतर नमाज करून प्रार्थना करायची आणि उपास सोडायचा हे उपवास करणे काही सहज बाब नाही मात्र नेवासा शहरातील अलींना अफरोज शेख रा.कडू गल्ली या इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या ७ वर्षाच्या चिमुरडीने हा उपवास केला आहे कोरोना रोगाची महामारी संपूर्ण जगातून नाहीशी व्हावी अशी या चिमुकलीचे या उपवास करण्यामागची भावना असल्याचे तिने सांगितले.