खरवंडी ( प्रतिनिधी ):- लाॅकडाऊन मुळे वाहने बंद असल्याने हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीत तालुक्यातील गारोळयाचीवाडी येथील ११ ते १२ कुटुंबातील २६ मजुर पारनेर तालुक्यातील धोतरा गावात कांदा काढणीचे कामासाठी आले होते. कांदा काढणीचे काम पुर्ण झालेनंतर त्यांना आपल्या हिंगोली गावाकडे जाण्यापूर्वी करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी देशासह राज्यात लाॅक डाऊन झाल्या मुळे त्यानी गावी जाण्यासाठी बस किंवा अन्य काही साधन उपलब्ध नसल्याने हे मजुर आपल्या मुला बाळासह हिंगोली कडे पायी निघाले आसता बुधवारी रात्री खरवंडीत पोहचले रात्र झाल्या मुळे खरवंडीत थांबले आसता गावातील करोना दक्षता समीती सह पोलीस पाटील संतोष फाटके, सरपंच मुकुंद भोगे, पत्रकार उमाकांत भोगे, निलेश माळवदे, आदिनाथ आलवणे, मनोज चोरडिया यांचे सह तरुणांनी जिल्हा परिषद शाळेत त्याची जेवणाची व रहाण्याची व्यवस्था करून आधार दिला.
यातील दोन महिलेला पायी चालुन फोड आल्या मुळे सालटी निघुन पाय सुजून होते तर एका महिलेचे पाय सुजल्याने जोडले फसले होते, हे पासुन खरवंडीकरांच्या डोळ्यात पाणी आले. नेहमी सामाजिक कामात आघाडीवर असनारे जवाहरलाल चोरडिया यांनी अनवणी मजुरांसाठी व महिलांसाठी चप्पलाचे जोड दिले. चप्पल घालताना महिलांना आश्रु अनावर झाले होते त्यांचे बरोबर दिड वर्षाचा मुलगा व दोन वर्षाची मुलगी यांचे साठी दुधाची व भिस्किटाची व्यावस्था ग्रामस्थांनी केली होती.
Check Also
जिल्ह्यातील आणखी ०२ व्यक्ती कोरोना बाधीत ; जामखेड येथील कोरोना बाधीत मृत व्यक्तीच्या दोन्ही मुलांना लागण झाल्याचे स्पष्ट
🔊 Listen to this आज आणखी ०६ जण कोरोनामुक्त; एकूण १८ जण कोरोना मुक्त …