कोरोनाचा संसर्ग रोखन्या साठी कडक उपाय योजना करण्याचे आदेश
परंडा उपसंपादक सुरेश बागडे
वाळू माफीयांचे गर्दनकाळ ठरलेले परंड्याचे तहसिलदार अनिल कुमार हेळकर हे उपचारा करून चार महिन्या नंतर पुन्हा परंडा तहसिल येथे रुजु झाले असुन परंडा तालूक्यात कोरोनाचा संसर्ग रोखन्या साठी दि २८ रोजी बैठक घेऊन कडक उपाय योजना करण्या साठी आदेश दिले आहे .
परंडा तालुक्यातील शेळगाव व चिंचपूर(बु) ही दोन्ही गाव कोरोणास्पॉट आसलेल्या अहमदनगर जिल्हातील जामखेड तालुक्याच्या जवळ आहेत. जामखेड तालुक्या मधुन परंडा तालुक्यात कुठल्याही प्रकारे संक्रमण होवू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना दि. २८ एप्रिल रोजी कर्तव्यदक्ष तहसिलदार अनिल कुमार हेळकर व गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर यांच्या सोबत गावाची पाहाणी केली.
यावेळी सभापती सतीश अर्जुनराव दैन यांनी शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये. वैद्यकीय अधिकारी,सरपंच ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांची बैठक घेऊन त्यांना योग्य त्या सुचना दिल्या. तसेच दोन्ही गावांच्या जामखेड सीमांवर चोवीस तास चेक पोस्ट चालू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अनिल कुमार हेळकर कामावर रुजू होत असल्याचे कळताच तालुक्यातील नागरीकातुन कर्तव्यदक्ष आधिकारी रुजू झाल्याचा आनंद व्यक्त केला जात आहे
तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी दि.२६ एप्रिल रोजी कामाचा पदभार घेऊन तात्काळ २७ एप्रिल रोजी वाळूमाफीवर कार्यवाही करत दोन ट्रॅक्टर पकडले. दि.२८ रोजी कोरोणासंदर्भात दोरा करीत कर्तव्यदक्ष अधिकारी आल्याचे नागरीकातुन समाधान व्यक्त केले जात आहे.