परंडा महसुल कार्यालयात गृह युध्द पेटले ; अधिकाऱ्याच्या विरोधात कर्मचारी फडात
उपसंपादक सुरेश बागडे
परंडा महसूल विभागातील नायब तहसीलदार तुषार बोरकर हे कार्यालयातील कर्मचारी यांना वारंवार अपशब्द अरेरावीची भाषा वापरून अपमानास्पद वागणूक देत असुन त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी अन्यथा अंदोलन छेडन्यात येईल असा इशारा कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे .
तहसिलदार यांना दि २५ एप्रील रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नायब तहसिलदार बोरकर हे अरेरावी व अपमानस्पद वागणुक देत असल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे मानसीक खच्चीकरण होऊन कार्यालयीन कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे.
कोरोनो व्हायरस वर प्रभावी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यासाठी शासन नियमानुसार १०%दहा टक्के कर्मचारी यांनी कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश असताना तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक उपाययोजण्यासाठी नेमून दिलेल्या आदेशाप्रमाणे व नियमित कार्यालयीन कामकाज पार पाडत आहेत.
बोरकर यांच्या वर्तणुकीमुळे कार्यालयातील कर्मचारी मानसिक दडपणाखाली वावरत आहेत याचा आमच्या शारीरिक व कौटुंबिक स्वास्थावर अनिष्ट परिणाम होत आहे
तरी संबंधितांनी नियमानुसार प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी तसेच संबंधित अधिकारी यांच्या वर्तणुकीत सुधारणा न झाल्यास तालुका महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर ए.पि.बनसोडे, (अ.का) पी.बी कावरे (अ.का), एच. व्ही.मुळे (अ.का), एन.बी. करळे (अ.का), श्रीमती पी.जी. ऐतवाडे(अ.का),श्रीमती एस.टी. साळुंखे (लिपीक), पी.व्ही.वेदपाठक(लिपीक) जे.एस. खुणे(लिपीक) , ए.व्ही.बाभळे(लिपीक) , एम.व्ही. कदम ( लिपीक ),एम ए वाघमारे(लिपीक) ,नवनाथ येलगुंडे(लिपीक) श्रीमती ठोंबरे(लिपीक)एन.के.जाधव(लिपीक) , जिवन बनसोडे. (वाहनचालक)यांच्या स्वाक्षरी आहेत.