Breaking News

कोरोना दौंड मध्ये दाखल श्रीगोंदा प्रशासनापुढे ‘ त्याला ‘ रोखण्याचे कडवे आव्हान

श्रीगोंदा ( प्रतिनिधी ):- कोरोना विषाणू अर्थात covid 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रशासन रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून काम करीत आहे श्रीगोंदयाच्या स्थानिक प्रशासनाने देखील कोरोना ला आमच्या तालुक्यात प्रवेश करूच देणार नाही जणू अशी शपथच घेतली असावी त्यामुळेच कोरोना ला श्रीगोंदा तालुक्यात नो एन्ट्री आहे .
तालुक्याच्या मध्यातून भलेही इतर जिल्ह्यात जाणारा मार्ग रस्ता असला तरीही प्रशासनाने कोरोनाला रोखण्याच्या दृष्टीने तालुक्याच्या सीमा मात्र अगदी अभेद्य ठेवल्या आहेत असेच म्हणावे लागेल तर हा जागता पहारा व रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून चाललेले स्थानिक प्रशासनाचे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत मात्र आता खडा पहारा भेदून कोरोना नावाच्या राक्षसाचा तालुक्यात प्रवेश करण्याचा आटोकाट प्रयत्न चालला आहे कारण त्याला शेजारील दौंड तालुक्यात प्रवेश मिळाला आहे व तो उंबरठ्यावर उभा राहून श्रीगोंदे करांना *येऊ का घरात ?* असे विचारत असावा.
मुंबई येथे कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या आपल्या सुरक्षा बांधवां मार्फत ( राज्य राखीव दलाचे जवान ) त्याने शेजारील दौंड तालुक्यात प्रवेश मिळवला आहे व दौंड हद्दीच्या अगदी जवळ व दररोज नित्य नियमाने दौंड शी ज्या गावांचा संबंध येतो अशी निमगाव व गार ही गावे आहेत. या गावांचा बफर झोनमध्ये समावेश झाला असल्याने श्रीगोंदा प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. ही दोन्ही गावे श्रीगोंदा तालुक्यात येत असली तरी त्यांचे दौंड जवळचे अंतर , दैनंदिन व्यवहार व अवागमन पाहता दौंड चे प्रांताधिकारी यांनी श्रीगोंद्याच्या तहसीलदारांना यासंदर्भात लेखी आदेश व गंभीर परिस्थितिची जाणीव करून दिल्याने तालुक्यातील यंत्रणा सतर्क झाली असून यासंदर्भात तातडीची बैठक घेऊन परिस्थितीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने निमगाव खलू व गार या दोन्ही गावांची पाहणी करून प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी संबधित यंत्रणा रवाना झाली आहे दौंड मधे कोरोना दाखल झाल्याने श्रीगोंदा प्रशासनाला ‘ त्याला ‘ रोखण्याचे कडवे आव्हान पेलावे लागणार आहे.

Check Also

कोरोना रोगाची महामारी संपूर्ण जगातून जाण्यासाठी ७ वर्षाच्या चिमुकलीचे रोजाचे उपवास 

🔊 Listen to this नेवासा ( प्रतिनिधी ): – रमजानच्या पवित्र महिन्यात चंद्र दर्शन होईपर्यंत …