श्रीगोंदा ( प्रतिनिधी ) :- तालुक्यातील काष्टी येथील बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्टच्या ‘परिक्रमा’ शैक्षणिक संकुलातील औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील कु. देवयानी केदार हिने श्री. बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर येथे आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत इंग्लिश विभागात प्रथम क्रमांक पटकावला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील निर्मळ यांनी दिली. शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत अभ्यासेतर उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी परिक्रमा सतत प्रयत्नशील असते.
यशस्वी विद्यार्थिनीचे परिक्रमा संकुलाचे संचालक प्रतापसिंह पाचपुते यांनी अभिनंदन केले.