Breaking News

तळीरामांसाठी खुशखबर ! तिन्ही क्षेत्रांत मद्यविक्रीस मुभा

मुंबई ( प्रतिनिधी ):-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या 17 मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र हा लॉकडाऊन 17 मेपर्यंत लागू करण्यात आला असला तरी देशातील सर्व जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अशा तीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. 4 मेपासून सुरू होणाऱ्या लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील केशकर्तनालये आणि सलून उघडण्यास परवानगी दिली आहे. आता आणखी एक मोठी घोषणा राज्य सरकारने केली आहे. रेड झोनमध्ये सुद्धा दारुविक्रीस परवानगी देण्यात आली आहे. मुंबई, पुण्यातील तसेच कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रांत मद्यविक्रीस मुभा देण्यात आली आहे.  या काही बदल करण्याची मुभा जिल्हाधिकारी याना देण्यात आली आहे.

मात्र असे असले तरी रेड झोनमध्ये असलेले सलूनचे दुकानं उघडण्यास मनाई करण्यात आली आहे.तसेच तीनही क्षेत्रातील बाजारपेठा व मॉलमध्ये नसलेल्या, स्वतंत्र अशा दारूच्या दुकानांसाठी ही परवानगी देण्यात आली आहे. यात ग्राहकांना एकमेकांपासून 6 फुटांचे अंतर ठेवावे लागणार आहे, तसेच एका वेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात असणार नाहीत हेही सुनिश्चित करावे लागणार आहे. कोरोनाच्या संकटात संपुर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्यानं सरकारचा मोठा महसूल बुडत असल्यानं मद्यविक्रीची दुकाने खुली करण्याचा निर्णय घेतला आहे.

Check Also

श्रीगोंद्याचे पत्रकार शिवाजी साळुंके यांच्यावर हल्ला ; पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

🔊 Listen to this   श्रीगोंदा ( प्रतिनिधी ):- दै.सार्वमतचे श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी पत्रकार शिवाजी …