उपसंपादक सुरेश बागडे ( परंडा )-
कल्याणसागर समूहाचे संस्थापक अध्यक्ष आमदार मा. सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून संरक्षणासाठी कल्याणसागर अर्बन को- ॲापरेटिव्ह बॅंकच्या वतीने १० हजार वाॅशेबल फेस मास्कचे वाटप करण्यात येत आहेत.
कल्याणसागर अर्बन बॅंकच्या वतीने बॅंकेचे ग्राहक, सभासद व नागरिकांना कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावपासून संरक्षण करता यावे आणि पुढील बराच काळ फेस मास्कचा वापर करणे अनिवार्य असणार आहे. याकरिता दहा हजार वाॅशेबल फेस मास्कचे वाटप करण्यात येणार असून या वाॅशेबल फेस मास्क वितरणाचा प्रारंभ कल्याणसागर बॅंकचे चेअरमन डाॅ. मंदार पंडीत, व्हाईस चेअरमन राजेंद्र चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजसिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
नागरीकांनी कोरोना विषाणू विरूद्धच्या या लढाईत शासनाच्या आदेश निर्देशांचे तंतोतंत पालन करून प्रशासनास सहकार्य करावे आणि घरातून बाहेर पडताना स्वःच्या आणि आपल्या परिवाराच्या सुरक्षिततेसाठी मास्कचा वापर करावा, असे आवाहन कल्याणसागर बॅंकचे चेअरमन डाॅ. मंदार पंडीत व व्हाईस राजेंद्र चौधरी यांनी केले आहे.