वनकुट्याच्या राजाचं जल्लोषात विसर्जन

 

सामजिक, धार्मिक, राजकीय ऐक्याच प्रदर्शन

वनकुटे ( प्रतिनिधी ):- वनकुटे गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना यशस्वी झाली असुन सलग दुसऱ्या वर्षी ही अतिशय आनंदाच्या वातावरणात गणेशोत्सव पार पडला व काल पारंपरिक वादयांच्या गजरात अतिशय भावनिक वातावरणात या वनकुट्याच्या राजाचे विसर्जन करण्यात आले.
गेल्या अकरा दिवस क्रिकेट लीग रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, चमचा लिंबू स्पर्धा ,होम मिनिस्टर ,मराठी शाळेतील मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, हायस्कूल मधील मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, ढवळपुरी आश्रम शाळा सांस्कृतिक कार्यक्रम, प्रसिद्ध जादूगार प्रकाश शिरोळे यांची जादूचे प्रयोग, ठकशेन शिंदे ,रामदास गुंड यांचा कलगीतुरा, सप्तसूर एक सरगम मुंबईचा ऑर्केस्ट्रा या कार्यक्रमांच्या आयोजनाणे वनकुटेकर मंत्रमुग्ध झाले या कार्यक्रमांसाठी ग्रामस्थांची गर्दी विशेषकरून महिलांची गर्दी उल्लेखनीय होती
शेवटच्या दिवशी विसर्जन मिरवणूक अतिशय थाटामाटात कुठलाही गुलाल न उधळता फटाके न वाजवता ढोल पथक यांच्या सुरातालात गावातील सर्व महिला हिंदू संस्कृती नऊवारी साड्या परिधान करून मिरवणुकीत मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते तसेच वयस्कर म्हातारे लोक सुद्धा मिरवणुकीत सहभागी झाले होते तरुण मुलांची उपस्थिती ही खूप होती ढोल ताशा यांच्या सुरात पुरुषाला बरोबरच स्त्रियांनीही गणराया समोर नृत्य करून गणरायाला भावपूर्ण निरोप दिला
गणरायाला निरोप देताना सर्वांचे डोळे पाणावले होते
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीसरपंच राहुल झावरे, उपसरपंच बंडू कुलकर्णी ,ग्रामपंचायत सदस्य दिपक खामकर, विकास गागरे, भिमराज गांगड, बबन मुसळे, इंदुबाई साळवे ,सुनिता वाबळे, वर्षा बर्डे,एक गाव एक गणपती मंडळाचे अध्यक्ष शुभम खैरे, उपाध्यक्ष शक्ती साळवे ,बंटी बुचडे, कार्याध्यक्ष आदिनाथ ढवळे प्रदीप मुसळे ,पवन खामकर,गणेश देशमुख, संजय खैरे, कैलास मुसळे ,अमोल गागरे ,मा उपसरपंच बाबाजी गागरे, कानिफशेट लोणकर, राजू डहाळे उत्तम खैरे ,काळे गुरुजी, बबन खामकर, रामभाऊ साळवे,सुभाष खामकर टायगरशेठ शेख, बाळासाहेब खामकर ,बाळासाहेब बर्डे,जालिंदर बर्डे ,रेवनशेठ लोणकर, सिताराम औटी, बबलू शेठ हैलकर, दगडूशेठ केदारी, कारभारी मुसळे, बबन बर्डे, काशिनाथ भगत,बबन काळे, संतोष तिखोले, संतोष डोखे,प्रशांत बुचडे ,भालचंद्र साळवे,निवृत्ती साळवे,गणेश साळवे,लखन शिंदे यांनी खूप परिश्रम घेतले.

Check Also

पैन को आधार से लिंक करने की प्रक्रिया सरल बनाएगा आयकर विभाग

🔊 Listen to this नई दिल्ली: आधार कार्ड को पैन कार्ड से लिंक करने के …