
श्रीरामपुर ( प्रतिनिधी ):- सार्वजनिक उपयोगिता सैवा’ सुलभतेने सर्व जनसामान्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा टपाल खाते प्रयत्न करत आहे, नागरिक केंद्रित सैवा’ या टपाल खात्यामार्फत भारतातील प्रत्येक टपाल कार्यालयामधून तरोच घरपौच दिल्या जातात. हि योजना श्रीरामपुर टपाल विभागातील नागरिकांना वरदान ठरणार आहे. खा.सदाशिव लोखंडे यानी या योजनेसाठी पाठपुरावा केल्याने खा. लोखंडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सर्वसामान्यांपर्यंत सरकारी आणि खासगी उपयोगिता सेवा पोहोचविण्यासाठी भारत सरकारच्या ्-
गवर्नन्स उपक्रमापैकी एक आहे. कॉमन सर्विस सेटर म्हणजेच सामान्य सेवा केंद्राची उभारनी सर्व
आर्थिक, सामाजिक, राजकीय अडथळे दूर करत या सामान्य सेवा केंद्राच्या माध्यमातून सरकार देशातील प्रत्येक नागरिकाला अनेक सेवा आणि सुविधा प्रदान करते. बिल देयके असो, सार्वजनिक दस्तऐवज आणि सेवांमध्ये प्रवेश करणे असो, संस्थात्मक आर्थिक जीवन विमा सेवा असो, भारताच्या कानाकोप-यातील विविध सरकारी योजनांच्या लाभार्थींना रोख रक्कम देणे असो ‘सामान्य सेवा केंद्रे’ लोकांचे जीवन अधिक सुलभ करतात.
इतर भागातील लोकांच्या तुलनेत शहरी भागातील किंवा जिल्हा मुख्यालयातील लोकांना या सुविधा अगदी सहज उपलब्ध होवू शकतात.
आम्हाला है जाहीर करण्यास अत्यंत आनंद गौँरव वाटत आहे कि भारत सरकारने आता भारतीय टपाल
खात्याला ‘कॉमन सेर्विचे सेंटर ‘म्हणून ओळख देऊ केली आहे. गेल्या दीडशे वर्षाहून अधिक भारतातील
कानाकोप-यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणारे तुमच्या अगदी जवळचे विश्वासू असे है भारतीय टपाल खाते आता आपल्या नेहमीच्या पोस्टल, बॅकिंग आणि इन्शुरन्स इत्यादी सर्व सेवांच्या बरोबर अनेक नागरिकांना
‘सार्वजनिक उपयोगिता सेवा’ सुलभतेने पोहोचविण्यास तत्पर झाले आहे. २२ विविध सेवा देणारे व्हॅंडर्स आता
भारतीय टपाल खात्याशी सलग्न झाले असून या सर्व सेवा जनतेला ठराविक पोस्ट ऑफिसेस मधून योग्य तो दर आकारून, ‘कॉमन सेर्विचे सेंटर ‘मार्फत दिल्या जातील. प्रायोगिक तत्वावर श्रीरामपूर पोस्ट ऑफिस व पंढरपूर हैड पोस्ट ऑफिस मध्ये ‘कॉमन सेर्विचे सटर ‘ची सुरुवात दिनांक ४ मे २०२० रोजी करण्यात येत आहे. जनतेला
अतिशय सुलभतेने, मोकळ्या जागेमध्ये, निवांतपणे व्यवहार करता यावे म्हणून या दोन पोस्ट ऑफिसची निवड केली गेली आहे. यथावकाश इतर पोस्ट ऑफिस मध्ये सुद्दा ही सेवा उपलब्ध करून दिली जाईल.
श्रीरामपूर हैड पोस्ट ऑफिस मधील कर्मचारी सर्व सुरक्षेची काळजी घेऊन तसेच योग्य ते सामाजिक
अंतर राखून ‘कॉमन सेर्विचे सेंटर’ संदर्भातील व्यवहार करतील. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे कि श्रीरामपूर हैड पोस्ट ऑफिस मध्ये सुरु होणार्या या ‘कॉमन सेर्विचे सॅटर’ संदर्भातील सर्व सेवांचा लाभ घेऊन
भारत सरकारच्या नागरिक केंद्रित सुविधा देण्याच्या उपक्रमास हातभार लावावा ही विनंती.
श्रीरामपूर पोस्ट ऑफिसमधील नागरिक सुविधा केंद्राचे शुभारंभ सोमवार दि ४ मै २०२० रोजी मा. खासदार श्री सदाशिवराव लोखंडे, शिर्डी लोकसभा मतदार संघ यांचे शुभहस्ते या होणार असुन नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीरामपूर विभागाचे डाक अधीक्षक यांनी केले आहे.