
सोनई (सतिश टेमक) : पर्यावरणाचा समतोल राखावा ,वृक्षलागवड चळवळ व्यापक व्हावी तसेच
पर्यावरणाला धार्मिक जोड म्हणुन शनैश्वर देवस्थानच्या माध्यमातुन शनीभक्तांना लिंबाचे झाड प्रसाद म्हणुन देण्याचा निर्णय घेतला असल्याचे पुणे येथिल धर्मादाय सहआयुक्त व देवस्थानचे प्रशासकीय अधिकारी दिलीप देशमुख यांनी सांगितले.
आज शुक्रवार 12/10/2019 रोजी धर्मादाय सहआयुक्त देशमुख यांच्या हस्ते शनीभक्तांना प्रसाद म्हणुन लिंबाचे वृक्ष देण्यात आले.हा महाराष्ट्रात नव्हे तर देशातील देवस्थानमधील पहिलाच प्रयोग असल्याचे सहआयुक्त दिलीप देशमुख यांनी सांगितले.
त्यांच्याच संकल्पनेतुन शनैश्वर देवस्थानमध्ये पदाधिका-यांच्या उपस्थितीत वृक्षाचे वाटप करण्यात आले.
वृक्षलागवडीचा हा संदेश यामुळे देशभरात पोहचविण्यास मदत होणार आहे.
लिंबाचे आर्युवेदिक महत्व असल्यामुळे
देवस्थानच्या स्वमालकीच्या जागेत रोप वाटिका तयार करूण शनीभक्ताना देण्यात येणार आहे.
शनीभक्त शनीदेवाचा प्रसाद म्हणुन झाडाचे निश्चीतच संगोपन करतील या उद्देशाने प्रसाद म्हणुन वृक्ष देण्याचा निर्णय घेतल्याचा देशमुख म्हणाले.
यावेळी सहाआयुक्त देशमुख यांनी शनीदेवास अभिषेक घालत स्वंयभु शनीमुर्तीचे दर्शन घेतले.
यावेळी देवस्थानच्या अध्यक्षा अनिता शेटे,उपाध्यक्ष नानासाहेब बानकर, विश्वस्त डॉ.रावसाहेब बानकर,
आदिनाथ शेटे,शालिनीताई राजु लांडे,भागवत बानकर,आप्पासाहेब शेटे,पोलीस पाटील सयराम बानकर सहाय्यक कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दंरदले,अॅड. लक्ष्मण घावटे,वृक्ष संवर्धन विभागाचे सिताराम तुवर ,विश्वस्त व भाविक उपस्थित होते.