श्रीगोंदा ( प्रतिनिधि ) : – श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे मागील (जुन्या)वादाच्या कारणावरून रामदास बाळू गायकवाड व संदीप रामदास गायकवाड रा.देवदैठण यांना गुरुवार दि.१२ मार्च रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आदेश बाळू गायकवाड रा. नारायणगव्हाण ता पारनेर, सागर विनोद ससाने व चेतन कदम दोन्ही रा. देवदैठण ता श्रीगोंदा या तिघांनी डोक्यात कोयता मारून व पायावरती तलवार मारून जखमी केल्या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात संदीप ससाणे याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी फरार झाले आहेत
या बाबत सविस्तर वृत्त असे की श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील रहिवासी दीपक सुरेश ससाने वय २५ वर्ष हे गुरुवार दि.१२ मार्च रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घरात बसलेले असताना आरोपी आदेश बाळू गायकवाड रा. नारायणगव्हाण ता पारनेर, सागर विनोद ससाने व चेतन कदम दोन्ही रा. देवदैठण ता श्रीगोंदा यांनी फिर्यादी च्या घरी मोटरसायकल वर येऊन ती घराच्या समोर उभी करून पाठीमागे झालेल्या वादातून भांडण सुरू करून आरोपी आदेश गायकवाड व सागर ससाणे यांनी रामदास बाळू गायकवाड यांचे डोक्यात कोयता मारून व पायावरती तलवार मारून गंभीर जखमी केले तर त्याला वाचाविण्याकरिता मध्ये पडलेल्या संदीप रामदास गायकवाड याच्या मांडीवर चेतन कदम रा. देवदैठण याने हातातील तलवारीने वार करून गंभीर जखमी करून निघून गेले या प्रकरणी दीपक सुरेश ससाने वय २५ याच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलिस ठाण्यात Ipc- 326,504,506 आर्म एक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काॅ. एन. व्ही. शेलार हे करत आहेत.