घोडेगाव (प्रतिनिधी) :- कोरोना व्हायरस (कोव्हीड१९) या आजाराने जगभरात थैमान घातले .शासनाने महिना होत आला जनतेच्या हितासाठी आजार फैलावु नये म्हणून विविध उपाय योजना राबवत आहे. त्यात जनतेने घराबाहेर पडु नये म्हणून लाँकडाऊन केले आहे . मात्र घोडेगाव बस स्थानकावर दररोज सकाळी भाजीबाजार भरत असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
अहमदनगर जिल्हा मधे संशयित वाढत आहेत म्हणून अत्यावश्यक सेवा वगळता अनेक दुकान , आस्थापना , बंद आहेत मात्र घोडेगाव येथे अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली बसस्थानक येथे रोज सकाळी भाजी मंडई भरत आहे .तेथे दोन तिन तास गर्दी होत आहे. बाहेर गावचे शेतकरी, व्यापारी, फळ विक्रेते गर्दी करत आहे त्याच्या वर ना ग्रामपंचायत लक्ष देते ना पोलीस प्रशासन. अनेक लोक कुठल्याही सँनिटायझर चा ,मास्कचा वाफर न करता एकत्र येत असल्याने येथे धोका निर्माण होऊ शकतो. यात दोषी कोण घरात बसणारे की रस्त्यावर विनाकारण अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली बाहेर फिरणारे .
सोनई पोलीस स्टेशनचे स पो नी जनार्दन सोनवणे रोज गस्त घालतात पण तेवढ्या पुरते सामसुम होते पुन्हा लोक ,फेरीवाले रस्त्यावर येतात .येथे चांदा,शिगवे,लोहगाव, झापवाडी, सह शेजारच्या गावासह नेवासा येथुनही फळ विक्रेते येत आहेत .
ग्रामपंचायत व सोनई पोलीस स्टेशनने लाँकडाऊन ची गंभीरपणे दखल घ्यावी अशी सुज्ञ नागरिकांचे वतीने मागणी होत आहे.