श्रीगोंदा ( प्रतिनिधी ):- कुकडीचे आवर्तन शुक्रवार दिनांक सतरा एप्रिल रोजी सुटणार असल्याची माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली .
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की पाणी लवकर सुटले होते मात्र आपल्याकडे येण्यास उशीर झाला आहे याबाबत आपण सल्लागार समितीच्या बैठकीत बोलनार आहोत. पाणी उद्यापासून सुटणार आहे यामध्ये सर्वांचे भरणे ही होणार आहे मात्र कोरोणाबाबत प्रशासनाने लागू केलेल्या आचारसंहितेचे पालन करून पाण्याचे नियोजन करावे लागेल. येडगाव माणिकडोह चा प्रश्न वरिष्ठांच्या कानावर घातल्याचे त्यांनी सांगितले.