
श्रीगोंदा ( प्रतिनिधी ) :- तालुक्यातील एका संशयीत रुग्णास तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवलाअसल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉक्टर खामकर यांनी दिली. तालुक्यातील एका छोटय़ा गावातील रहिवासी मात्र सध्या शिवाजीनगर पुणे येथे नोकरीस असलेल्या तरुणास काही दिवसांपूर्वी ताप अंगदुखी असा त्रास होत होता. त्यामुळे आजारपणाची सुट्टी घेऊन तो गावी आला होता. गावाकडे आल्यानंतर त्यास रक्ताची उलटी झाल्याने त्याची स्थानिक आरोग्य उपकेंद्रात तपासणी करून त्यास अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
तालुक्यातील तीन दिवसांपूर्वी पाठवलेल्या एका संशयित रुग्णांचे रिपोर्ट येने बाकी असतानाच आता पुन्हा नव्याने एक संशयित रुग्ण पुढे आल्याने तालुक्यात पुन्हा चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.