कर्जत (आशिष बोरा याजकडून):- कर्जत तालुक्यातील ९७ छावणी चालकांनी आपली रखडलेली २५% बिले मिळावीत अशी मागणी कर्जत तहसील कार्यालयाकडे केली. सहा महिने होऊनही बिले न मिळाल्याने आता छावणी चालकांना वाचविण्याची वेळ आली आहे.
मागील वर्षी दुष्काळी काळात मार्च २०१९ ते ऑक्टोबर २०१९ या उन्हाळ्याच्या काळात छावणी चालकांनी तालुक्यातील पशुधन वाचविण्यासाठी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवत, आपली जमापुंजी लावून,तर कुणी लाखो रुपयांचे कर्ज काढून, कर्जत तालुक्यातील विविध गावात ९७ छावण्यात चालवल्या, शासनाने अत्यंत काटेकोर निकष लावून, विविध तपासण्या करून या छावण्यांवर लक्ष ठेवले, छावणी चालकांनी आपल्या परिसरातील पशुधन जगले पाहिजे म्हणून विशेष प्रयत्न करून हा काळ पार पाडला, मात्र प्रशासनाने सहा महिने होऊन ही छावणी चालकाची बिले दिलेली नसून पशुधन वाचविणार्या छावणी चालकांना वाचविण्याची वेळ आली आहे. मार्च १९ ते जून १९असे चार महिन्याचे पूर्ण बिल शासनाने दिले आहे तर जुलै व ऑगस्ट महिन्याचे ७५ टक्के बिल छावणी चालकांना अदा करण्यात आले आहे जुलै व ऑगस्ट महिन्याचे २५% बिलासाठी पैसे कर्जत तहसील कार्यालयात आलेले असून सदरचे बिल त्वरित मिळावे, अशी मागणी या छावणी चालकांनी केली आहे, तर सप्टेंबर ऑक्टोबर या दोन महिन्याचे तीस छावण्यात बिलही अद्यापी पेंडिंग असून तेही त्वरित मिळण्याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. छावणी चालकांचे बिल मिळण्यासाठी नामदार बाळासाहेब थोरात व आमदार रोहित पवार यांना निवेदन देऊन या विषयात लक्ष घालण्याची विनंती करणार आहोत अशी माहिती या छावणीत चालकांनी दिली, कर्जत तहसील कार्यालयात जुलै व ऑगस्ट महिन्याच्या २५ टक्के बिलासाठी सहा कोटी आलेले असून ते त्वरित मिळावेत अशी मागणी या छावणीत चालकांनी केली आहे याबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालावे असे यावेळी सर्वांनी म्हटले आहे. छावणी चालक डॉ मधुकर कापरे, बापुसाहेब नेटके मेजर, संतोष खळगे, कल्याण नवले, राहुल सरकाळे, बिभिषण अनारसे, बबन धांडे, भाऊसाहेब गुंड, परशुराम मुळे, प्रविण तापकीर, सुधीर यादव, भाऊसाहेब गाढवे, लालासाहेब शेळके, गोरख जगताप, गणेश तोरडमल यावेळी उपस्थित होते.
Check Also
नेवासा शहरासाठी दिलासादायक ! उद्यापासुन शहरातील काही दुकाने उघडणार
🔊 Listen to this नेवासा ( प्रतिनिधी ) :- २२ मार्चपासून लोक डाऊन मुळे नेवासा …