श्रीगोंदा ( प्रतिनिधी) :- मांडवगण परिसरात काही तरुण चिकन पार्टी करणार असल्याची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी तातडीने मांडवगण गाठल़े. तेथील गोसावीवाडी जवळ असलेल्या एका झाडाखाली अकरा तरुण मुले एकत्र बसलेली दिसली पोलिसांनी त्यांना लॉक डाऊनच्या काळात बाहेर येण्याचे कारण विचारले असता त्यांनी आम्ही चिकन पार्टी करण्यासाठी येथे जमलो असल्याचे सांगितले.
हे ऐकताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. संचारबंदी व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून चिकन पार्टी करणे कामी एकमेकांच्या जवळ येऊन तोंडाला काही एक न बांधता कोरोना साथीच्या रोगांबाबत कोणतीही काळजी घेतली नाही.
या प्रकरणी विशाल कुसेकर, वैभव मनवरे, गौरव मनवरे, राहुल पवार, प्रकाश मनवरे, भाऊसाहेब पवार , अतुल चौगुले , रवींद्र कुचेकर, हृतिक जाधव, सूरज मनवरे , चेतन मनवरे, रा सर्व गोसावीमळा या अकरा तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.