नवी दिल्ली ( टिम लोकवीर टाईम्स ) :- कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि कोरोना संबंधित माहितीसाठी ‘आरोग्य सेतू’ अँँप विकसित केले आहे. या अँँपचा वापर करण्याचे आवाहन केंद्र सरकारच्यावतीने वारंवार केले जात असून, पोलिसांनी आता ‘आरोग्य सेतू’ अँँप अनिवार्य केले आहे. नागरिकांकडे ‘आरोग्य सेतू’ अँँप नसल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आदेश पोलिसांनी काढले आहेत.
कोरोनाविषयीच्या माहितीत सूसुत्रता आणण्यासाठी त्याचबरोबर संसर्ग झालेल्या रुग्णांची माहिती ठेवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘आरोग्य सेतू’ अँँप तयार केले. हे अँँप देशभरात वापरले जात आहे. तर अनेक जणांकडे हे अँँप नाही. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे, पण आरोग्य सेतू अँँप नाही, अशा नागरिकांविरुद्ध पोलीस कलम १८८ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा दंडाधिकारी त्या व्यक्तीला शिक्षा द्यायची, दंड ठोठवायचा की, सोडून द्यायचे हे ठरवतील.
पकडल्यानंतर लोकांनी जर हे अॅप लगेच डाउनलोड केले, तर त्यांना कोणतीही कारवाई न करता सोडण्यात येईल. लोकांनी आदेश गांभीर्याने घेऊन अँँप डाउनलोड करावे म्हणून पोलीस हे काम करत आहे. पण, वारंवार इशारा देऊनही जर अॅप डाउनलोड केले नाही,पोलीस त्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करतील.पकडल्यानंतर हे अँँप डाउनलोड करण्यासाठी व्यक्तीकडे इंटरनेट शिल्लक नसेल, तर पोलीस ‘हॉटस्पॉट’द्वारे ही सुविधा पुरवतील. पण, जर मोबाईलमध्ये स्टोरेज नसेल, तर मग त्या व्यक्तीचा नंबर घेतला जाईल. त्यानंतर त्या व्यक्तीने अँँप डाउनलोड केले की नाही, याचा पाठपुरावा केला जाईल, असे नोएडाचे कायदा आणि सुव्यवस्था पोलीस उपायुक्त अखिलेश कुमार यांनी सांगितले. नोएडात ‘आरोग्य सेतू’ अँँप मोबाईलमध्ये ठेवण्याची पोलिसांनी सक्ती केली आहे.