
भेंडा ( प्रतिनिधी ) :- कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभुमीवर देशात लॉकडाऊन आहे त्यामुळे गोरगरीब लोकांना रोजंदारीला जाता येत नसल्याने त्यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे,
त्यामुळे सौंदाळा गावातील अंत्योदय व प्राधान्य चे रेशनकार्ड असलेल्या ३२२ कुटुंबांचे स्वस्त धान्याची रक्कम दुकानदास सरपंच सौ,प्रियंका शरदराव आरगडे यांनी स्वखर्चातुन दिले आहेत त्यामुळे यावेळेस मे महिन्यातील धान्य ग्रामस्थांना पुर्ण मोफत मिळणार असल्याने कोरोनाच्या संकटात ग्रामस्थांना सहकार्य झाल्याने सर्व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे
सरपंच सौ,प्रियंका आरगडे ह्या अशा पद्धतीने मदत करणा-या महाराष्ट्रात पहिल्या सरपंच आहेत
सौंदाळा गावात कोरोनाचे पार्श्वभुमीवर अतिशय काटेकोर सोशल डिस्टन्सींगचे नियम ग्रामपंचायती कडुन राबविले गेले आहेत.
गावात धान्य वाटप रांगेत उभे रहाण्या ऐवजी ग्रामपंचायतने सॅनिटाईज करुन ग्रामस्थांना बसायला खुर्च्या बसायला दिल्या त्यामुळे वृद्धांना रांगेत उभे राहण्याचा ञास झाला नाही.
तसेच भेंडा येथील आठवडे बाजार बंद झाल्याने भाजी पाला मिळणे कठीण झाले होते अशा वेळी ग्रामपंचायतीने गावातच सोशल डिस्टन्सींगचे नियोजन करुन रविवार व गुरुवार भाजी मंडई सुुरु केल्याने ग्रामस्थांना वेळेवर भाजीपाला मिळायला मदत झाली
कोरोनाचे प्राथमिक लक्षण तपासणीसाठी ग्राम स्थरावर कोणतीही साधन सामग्री नसल्याने ग्रामपंचायतीने थर्मल गन व ऑक्सी पल्स मीटर खरेदी केले.
शहरातुन गावात येणा-या व्यक्तिंसाठी मा,जिल्हाधिकारी अहमद नगर यांचे आदेशान्वये जिल्हा परीषद शाळेत विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे
ग्रामपंचातीने ग्रामस्थांनी १००%कर भरल्यास मोफत दळणाची सुविधा दिली आहे परंतु कोरोनामुळे कर भरण्याची गरज नसुन सर्वांना मोफत धान्य दळुन देणारी जिल्ह्यातील सौंदाळा पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे,
अशा प्रकारे कोरोना विषाणु प्रसार रोखण्यासाठी सौंदाळा ग्रामपंचायतीने नाविन्यपुर्ण उपक्रम राबविले आहेत,
त्याच्या या कार्याचे नेवासा तालुक्यात सर्वञ कौतुक होत अाहे याबाबत मा,जलसंधारण मंञी शंकरराव गडाख साहेब यांनी अभिनंदन केले आहे.