कर्जत (आशिष बोरा यांजकडून):- कोरेगाव ग्राम पंचायतीच्यावतीच्या वतीने ग्रामनिधी व 15 टक्के मागासवर्गीय कुटुंबासाठी राखीव असलेल्या निधीतून जीवनावश्यक किराणा मालाचे वाटप करण्यात आले.
कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथे ग्राम पंचायतीच्यावतीच्या वतीने मागासवर्गीय कुटुंबासाठी वैयक्तिक लाभ देण्यासाठी अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असलेल्या 15 टक्के 2019-20 च्या निधीतून व ग्रामनिधीतून मागासवर्गीय कुटुंबांना किराणा सामानाचे वाटप करण्यात आले. गावातील 150 कुटुंबांना लाभ देण्यात आला, यामध्ये साखर दाळ, तेल, चहापुडा, कोलगेट, मिर्चीपूड, हळदपूड, व इतर किराण्याचा समावेश होता. गावातील ग्रामपंचायत व कोरेश्वर मंदिरासमोर सोशल डिस्टन्स चा अवलंब करत प्रत्येक लाभार्थी व्यक्तीला उभा राहण्यासाठी चौकोन आखण्यात आले यामुळे अत्यंत सुंदर नियोजन करता आले वाटपाचे वेळी अजिबात गर्दी झाली नाही, यावेळी माजी सरपंच शिवाजीराव फाळके, सरपंच काकासाहेव शेळके, उपसरपंच चांदणी दत्तात्रय देवकर, ग्रा. पं. सदस्य दिलीप जाधव, उदयसिंग परदेशी, बाळासाहेब शेळके, रोहिदास अडसूळ, जवान भैलूमे, दत्तात्रय देवकर, ग्राम विकास अधिकारी ए व्ही वेताळ, सिद्धेश्वर वाघ, विवेक शेटे, कचरू अडसूळ, भागवत यांनी शेळके आदी उपस्थित होते, या किराणा मालाबरोबर अविनाश अडसूळ यांनी आयुर्वेदिक दंतमंजनही मोफत दिले तर गावातील व्यापारी विनेश उर्फ बाळूशेठ खाटेर यांनी अत्यंत कमी भावात किराणा माल उपलब्ध करून दिला अशी माहिती सरपंच काकासाहेब शेळके यांनी दिली.
Check Also
कर्जत येथे जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा
🔊 Listen to this कर्जत (आशिष बोरा यांजकडून):- कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालय येथे जागतिक परिचारिका …