बीड (प्रतिनिधी ): – मराठी साहित्य मंच काव्य समुह आयोजीत १ मे महाराष्ट्र दिनाचे औचीत्य साधून घेण्यात आलेल्या “महाराष्ट्र दिन विशेष प्रतिनिधीक ई- काव्यसंग्रह” ऑनलाईन प्रकाशन सोहळा रविवार दिनांक ३ मे रोजी काव्यरत्न प्रा .रावसाहेब भिकाजी राशिनकर (राज्यस्तरीय कुसुमाग्रज गौरव पुरस्काराने सन्मानित) मु.पो.चांदा, ता.नेवासा, जि. अहमदनगर यांच्या हस्ते अगदी थाटात संपन्न झाला.
महाराष्ट्रातील नामवंत सुप्रसिद्ध साहित्यिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. सद्यस्थितीत कोरोनाच्या प्रादुर्भाव काळात साहित्यिकांनी घरातच राहुन सरकारचा आदेश पाळून समुह प्रशासक व काव्य संग्रहाचे संपादक अंगद दराडे यांनी ४५ कवी , कवयित्रींच्या महाराष्ट्र दिन या विषयावर आधारित रचना ऑनलाईन समुहातून एकत्रित करून , रविवार दि. ३ मे रोजी अनेक कवी कवयित्री च्या ऑनलाईन उपस्थितीत प्रा .रावसाहेब भिकाजी राशिनकर यांच्या शुभ हस्ते काव्य संग्रहाचे ऑनलाईन प्रकाशन केले .काव्य संग्रहाचे प्रकाशन होताच महाराष्ट्रातील अनेक नामवंत कवी , कवयित्री यांनी त्यांचे लेखी अभिप्राय समूहात पाठवले.
यामध्ये माधुरी काकडे , गायकवाड रवींद्र गोविंदराव , राजेश लक्ष्मण वऱ्हाडे , हरिदास मा .गौतम , मनीष पाचघरे , के विजय , संतोष शिवाजी बामने , रा.द .नागरगोजे , आक्रोश खोब्रागडे , गणेश सुशिलाई तुकाराम पुंडे , प्रदीप महादेव कासुर्डे , नागेंद्र नेवारे , सुरेश कृष्णा भोपी , सौ शालू विनोद कृपाले इत्यादी अनेक नामवंत कवीच्या रचनाचा समावेश आहे .
समूह प्रमूख तथा प्रतिनिधी , काव्यसंग्रहाचे संपादक अंगद दराडे यांनी प्रकाशन सोहळा होताच अनेक साहित्यकांचे , आयोजकांचे व सहभागी कवी कवयित्री यांचे अभिनंदन करत आभार मानले.