Breaking News

आ. मुरकुटेंचा अर्ज वैधच ; गडाखांच्या हारकती फेटाळल्या

नेवासा(प्रतिनिधी):- नेवासा विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर क्रांतिकारी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख व सुनीता शंकरराव गडाख यांचे वतीने उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान घेतलेले सर्व आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळले असून मुरकुटेंचा उमेदवार अर्ज वैध ठरवला आहे.
आज उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार माजी आमदार शंकरराव गडाख व सुनीता शंकरराव गडाख यांच्यावतीने भाजपचे उमेदवार आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर हरकत घेतली होती.दोन्ही उमेदवारांच्या बाजूच्या वकिलांनी आप आपले म्हणणे निवडणूक निर्णय अधिकारी शाहुराज मोरे यांचे समोर मांडले. निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतलेल्या आक्षेपांची सत्यता पडताळून आ.बाळासाहेब मुरकुटे यांचा उमेदवारी अर्ज वैध असल्याचा निर्णय दिल्याने
मुरकुटेंचा उमेदवार अर्ज वैध ठरला आहे.
दरम्यान गडाखांनी मुरकुटेंचा उमेदवारी अर्जावर
हरकतींमुळे मुरकुटेंचे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.अर्ज वैध ठरताच विरोधकांनी कितीही अडचणी आणल्या तरी शनीदेवांची व जनतेची कृपा मुरकुटेंवर असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.

Check Also

मृत्युनंतर व्यक्तीचा अहवाल कोरोना बाधित ; संगमनेर तालुक्यात खळबळ

🔊 Listen to this   संगमनेर ( प्रतिनिधी ) : – तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक येथील …