घोडेगाव येथे भटक्या समाजातील गरजूंना तहसीलदार रूपेश सुराणांचे हस्ते किराणा वाटप

  घोडेगाव ( प्रतिनिधी ):-  कोरोना व्हायरस (कोव्हीड१९)मुळे गेली तिन आठवड्या पासुन लाँकडाऊन असल्याने अनेक गोरगरिब कुटुंबातील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे .त्यात घोडेगाव येथे भटक्या विमुक्त जाती जमातीची कुटुंब आहेत .त्यातील काहींंजवळ रेशनकार्ड देखील नसल्याने त्यांना धान्य मिळणे दुरापास्त झाले नेमकी हिच अडचण समाजातील काशिनाथ चौगुले या युवकाने नेवासा तहसीलदार रुपेश सुराणा यांच्या समोर अर्जाद्वारे मांडली. त्यास तहसीलदार यांनी तातडीने मदत देण्यासाठी तयारी दाखवली.
येथील नाथपंथी डवरी गोसावी समाजातील ५०कुटुंब व नंदीवाले जोशी समाजाची ३०कुटुंब यांना गहु तांदूळ ,साखर,चहापावडर,गोडतेल, गव्हाचे पिठ तुरदाळ अशा जिवनावश्यक किराणा सामान किट शनिवारी दुपारी त्यांच्या वस्ती मधे जाऊन तहसीलदार रुपेश सुराणा यांनी वाटप केले .आणखी गरिब गरजु असतील तर सांगा सर्वांना मदत करु कोणीही उपाशी राहु नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली .
काशिनाथ चौगुले,अंकुश कानडे , संजय शेगर, अमोल चौगुले,सह कामगार तलाठी राजेंद्र भुतकर, कोतवाल विष्णु गि-हे यावेळी ऊपस्थित होते .
शासनाने आम्हा गरिबांना योग्य वेळी मदत केली आमची उपासमार होऊ दिली नाही म्हणुन माय बाप सरकार व तहसीलदार रुपेश सुराणा यांचे काशिनाथ चौगुले यांनी आभार व्यक्त केले.

Check Also

नगर-औरंगाबाद महामार्गावर भरधाव टँकरच्या धडकेत पोलीस कर्मचारी जखमी

🔊 Listen to this अहमदनगर ( प्रतिनिधी ) :- नगर-औरंगाबाद महामार्गावरील शेंडी बायपास येथे गुरुवारी …