धक्कादायक ; कापलेले बाळाचे शिर आढळलल्याने शहरात खळबळ

 

औरंगाबाद ( प्रतिनिधी ) :- औरंगाबादमध्ये मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथील कवठीचा वाडा येथे एका बाळाचे शिर आढळून आले आहे. एक कुत्रा हे शिर घेऊन पळत असल्याचं सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केल्यामुळे कुत्रा हे शिर टाकून पळून गेला. धारदार शस्त्राने या बाळाचे शिर कापल्याचा पोलिसांचा प्रथमदर्शनी अंदाज असून या घटनेमुळे औरंगाबाद शहरात खळबळ उडाली आहे.

आज पहाटे ६ वाजेच्या सुमारास हे शिर आढळून आले आहे. बाळाचे हे शिर एक कुत्रा जबड्यात पकडून पळत होता. एका सुरक्षा रक्षकाने आरडाओरडा केल्याने कुत्र्याने हे शिर तिथेच टाकले आणि तो पळून गेला. बाळाची अत्यंर क्रूरपणे हत्या केली असून धारदार शस्त्राने शिर धडावेगळे केल्याचे दिसत आहे. कुणी तरी पहाटे कवठीचा वाडा येथे हे शिर आणून टाकले असावे, अशी शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान या घटनेची तातडीने पोलीस व मनपा प्रशासनाला माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून हे शिर कोणी आणून टाकले, ते कुठून आणले, या बाळाचे धड कुठे आहे याचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असताना बाळाचे शिर या परिसरात कोणी आणून टाकले? असा सवाल केला जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी आसपासच्या लोकांची चौकशी सुरू केली असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही पाहण्यात येत आहेत.

Check Also

नेवासा पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा ; ज्ञानेश्वर तोडमल यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन : विना वॉरंट घराची झडती प्रकरण

🔊 Listen to this   नेवासा (प्रतिनिधी): – विना वॉरंट तसेच राजकीय सुडबुध्दीतून मध्यरात्री घराची …