कुकाणा( ईस्माइल शेख) :- नेवासा तालुक्यातील कुकाणा न्यू इंग्लिश स्कूल, गेवराई येथे पावसाळी क्रीडा स्पर्धेस उत्साहात प्रारंभ झाला.
यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना जयश्रीताई गडाख यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी कष्ट व मेहनत करून तसेच पराभव पचविण्याची ताकद खेळामुळे मिळते. अपयशाची तमा न बाळगता नैसर्गिक खेळ करून खेळाडूने आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन केले. प्रमुख पाहुणे म्हणून नेवासा पंचायत समितीच्या सभापती कल्पनाताई पंडित, भारत सेवा संघाचे माजी अध्यक्ष कलापुरे,माजी सरपंच कपूरचंद कर्डिले, पांडुरंग सतरकर, मा.चेअरमन निलेश कर्डिले, दत्तात्रय कर्डिले, राजहंस मंडलिक, संभाजी कर्डिले, विस्तार अधिकारी आडेप मॅडम, किशोर गाले, अलका पाटील,प्राचार्य विनायक आहेर,भारती वाकचोरे, चंदा जगताप, महेबूब शेख,जयंती लोखंडे सह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ, खेळाडू उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक चंद्रकांत जाधव तर आभार अर्जुन हरिश्चंद्र यांनी मानले. नेवासा तालुका क्रीडा अध्यक्ष संजय राजगुरु यांनी डाॅ.संभाजी मेहेत्रे हे विजेत्या संघांना ट्राॅफी देणार असून, शंकरराव गडाख मित्र मंडळाकडून चार दिवस मोफत पिण्याच्या पाण्याची सोय तसेच 5000 रू.देणगी दिली असल्याची माहिती दिली. स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी उपाध्यक्ष देवीदास आंगरख,पत्रकार प्रा. सुनिल गर्जे,पत्रकार अध्यापक सुनिल पंडित, सचिव जयंत पाटील, नितीन मुंगसे, शिवाजी वाबळे, नितीन गडाख,माजी अध्यक्ष तुवर पाटील नवले सर, नाईक सर ,चक्रनारायण,सुनिल मोरे, प्रयत्नशील आहेत.
Check Also
विद्येविना मती गेली,मती विना निती गेली, नितीविना गती गेली. गतीविना वित्त गेले वित्ता विना शुद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले – महात्मा फुले.
🔊 Listen to this परंडा ( सुरेश बागडे ):- शिवरायांनवर पहीला पोवाडा लिहणारे,शिक्षणाचे महत्व जाणून …