नवी दिल्ली ( प्रतिनिधी ): – ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राम जेठमलानी यांच्या मागे पुत्र महेश जेठमलानी आणि अमेरिकेत राहणारी मुलगी असा परिवार आहे. जेठमलानी आजारी असल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
राम जेठमलानी यांचा जन्म 14 सप्टेंबर 1923 रोजी तत्कालीन मुंबई प्रांत असलेल्या पाकिस्तानमधील शिकारपूरमध्ये झाला. त्यांनी एस. सी. शहानी लॉ कॉलेजमधून वयाच्या 17 व्या वर्षी कायद्याची पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी अनेक खटल्यांचे कामकाज पाहिले.