बालाजी देडगाव ( विष्णु मुंगसे):- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील भाजप कार्यकर्तेनी क्रांतीकारी शेतकरी पक्षात जाहीर केला आहे. यामुळे देवगाव व देडगाव परिसरात क्रांतीकारी शेतकरी पक्षाची ताकद वाढली आहे.
देडगाव येथील हनुमान मंदिरा समोर सोमवारी 16 सप्टेंबर रोजी कुलदीप उलट यांचा21वा वाढदिवसानिमित्त नेवासा तालुक्याचे माजी आमदार शंकरराव गडाख यांचे चिरंजीव उदयनराजे गडाख हे वाढदिवसाच्या कार्यक्रमा निमित्त आले होते वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपताच देवगाव येथील भाजपचे कार्यकर्ते बापूसाहेब काळे व अनिल काळे तसेच देडगाव येथील बाबासाहेब उर्फ बाबू मुंगसे यांनी उदयनराजे गडाख यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी शेतकरी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी यांच्यासोबत सोनई येथून आलेले जालु नाना, चंद्रकांत मुंगसे, संतोष तांबे, बंटी चेडे, विकास राजाळे, गणेश लोंदे, अरुण घावटे, विनोद गवाडे व देडगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
सोनईकरांना कोणीतरी आवरारे असे म्हणण्याची वेळ ! सोनईमध्ये व्यावसायीकाबरोबर नागरिकांकडुन सोशल डिस्टीटींगचे उल्लंघन
🔊 Listen to this सोनई ( प्रतिनिधी ) :- संपूर्ण देशात सतरा मे पर्यंत लॉकडाउन …