Breaking News

एक लाखाची लाच स्वीकारताना पैठणचा तहसीलदार अटकेत

औरंगाबाद ( प्रतिनिधी ):- जमिनीचा निकाल लावण्यासाठी एक लाख रुपयांची लाच हस्तकाच्या सहाय्याने स्वीकारताना पैठणच्या तहसीलदाराला पकडले. लाच-लुचपत प्रतिबंधक विभागा(एसीबी)च्या पथकाने तहसीलदार महेश सावंतला दोन हस्तकांसह अटक केली. हस्तकाच्या सहाय्याने एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना पैठणच्या तहसीलदाराला पकडले
कैलास सोपान लिपणे आणि बद्रीनाथ भवर असे तहसीलदाराच्या खासगी हस्तकांची नावे आहेत. तक्रारदार शेतकऱ्याची 12 एकर कुळाच्या जमिनीचे प्रकरण तहसीलदार महेश सावंत यांच्या समोर सुरू होते. या प्रकरणाचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने लावण्यासाठी सावंत यांनी 30 लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र, तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात जाऊन तक्रार दिली. दाखल होताच लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पैठणच्या तहसील कार्यालयात सापळा रचला. तहसीलदार कार्यालयात लाच स्वीकारत असतानाच एसीबीच्या पथकाने तिघांना रंगेहात अटक केली.

Check Also

पोलिसांचा असाही अडमुठ्या पणाचा ‘कळस’… छोट्या किराणा दुकाणदाराची उचकापाचक करुन “दारु” विक्रत्यांना पोलिसांचे ‘अभय’

🔊 Listen to this नेवासा ( प्रतिनिधी ):- संचारबंदीच्या काळात जिवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर रहावेत …