
नेवासा (प्रतिनिधी) :- अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते विठ्ठलराव लंघे यांनी शनिवारी ना.पंकजा मुंडे त्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.त्यांच्या प्रवाशाने नेवासा तालुक्यात राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे.
पांढरीपूल येथे आयोजित सभेप्रसंगी ग्रामविकासमंत्री ना.पंकजा मुंडे,खासदार सुजय विखे,आमदार बाळासाहेब मुरकुटे,आमदार शिवाजीराव कर्डिले,आमदार मोनिका राजळे,अशोक गायकवाड, शिवसेना जिल्हा उपप्रमुख हरिभाऊ शेळके,ज्ञानेश्वर पेचे यांच्या उपस्थितीत लंघे व समर्थकांनी प्रवेश केला.
विठ्ठलराव लंघे यांनी या अगोदर दोन वेळेस विधानसभा लढवली,भाजपचे जिल्हाध्यक्षपद व राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असताना त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देखील भूषविले आहे.