साखर आयुक्त सौरभ राव यांची मुळा सहकारी साखर कारखान्यास सदिच्छा भेट.

 

सोनई ( प्रतिनिधी ):- महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त सौरभ राव हे शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी आले असताना त्यांनी मुळा सहकारी साखर कारखान्यास सदिच्छा भेट दिली. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर यांनी त्यांचे स्वागत करून माजी खासदार यशवंतरावजी गडाख यांनी लिहीलेली पुस्तके भेट देऊन सन्मान केला.
यावेळी सौरभ राव यांनी मा खा यशवंतरावजी गडाख व राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख पाटील मार्गदर्शनाखालील कारखाना व परिसरात फुलेल्या वनराईचे कौतुक केले.
यावेळी कारखान्याचे सेक्रेटरी वसंतराव भोर, कार्यालयीन अधीक्षक अशोक जेम्स , चीफ इंजिनियर एम एम ठोंबरे ,परचेस ऑफिसर लक्ष्मण बारगळ, जनसंपर्क अधिकारी बद्रीनाथ काळे, प्रशासन अधिकारी बी एस बानकर, चीफ अकाऊंट तुकाराम राऊत, डे चीफ अकाउंट हेमंत दरंदले, लेबर ऑफिसर रितेश टेमक,सुरक्षा अधिकारी प्रवीण चौधरी आदी उपस्थित होते.

Check Also

परिक्रमा औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील कु. देवयानी केदार वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

🔊 Listen to this   श्रीगोंदा ( प्रतिनिधी ) :- तालुक्यातील काष्टी येथील बबनराव पाचपुते …