हजारो वर्षाची धर्मसत्ता धोक्यात?.

माणूस सुखा समाधानाने जगण्यासाठी,दुख,दारीन्द्र आणि संकटातुन मुक्त होण्यासाठी, नियमितपणे देवाच्या मंदिरात जाऊन भक्तिभावाने प्रार्थना करतो.दान धर्म,दक्षिणा देतो.पण आज भारतातील सर्व मान्यताप्राप्त देवाची मंदिर बंद आहेत. कारण मंदिरात सर्व भक्त एकत्र आल्यास एकमेकांना स्पर्श होऊन बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.खबरदारीचा उपाय म्हणून सर्व धर्माचे प्रार्थनास्थळ बंद करण्यात आली. तुम्ही किती हि मोठे भक्त असला,उपास,उपासना,नवस,यज्ञ,मंत्र तोंड पाठ असलेले भक्त असला तरी मंदिरातील देव तुमचे रक्षण करणार नाही.याची जाणीव ठेऊन सरकारने सर्व धर्माची प्रार्थनास्थळे मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. परंतु आता त्यामुळे गंभीर वैचारिक समस्या समोर येत आहे. हजारो वर्षाची धर्मसत्ता धोक्यात येत आहे.

  कोरोना मुळे आज फक्त दवाखाने म्हणजे विज्ञानाचे दरवाजे खुले आहेत.देवाच्या मंदिरावर नियंत्रण असणारा समाज आज संपूर्णपणे गोंधळलेला आहे. त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे.त्यामुळे ते कोणते ही कृत करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत. वृत्तवाहिन्या,प्रचारप्रसार माध्यमाद्वारे जनतेला सत्य माहिती देण्या ऐवजी असत्य माहिती देऊन कायदा सुव्यवस्था बिगडविण्याचे काम त्यांचे जातभाई करीत आहेत. त्याचे एक नव्हे शेकडो उदाहरण आज समोर येत आहेत.बांद्रा रेल्वेस्टेशनबाहेर जमवला गेलेला जमाव हा सुनियोजित कट असल्याचीच शक्यता अधिक वाटतेय. बांद्रा रेल्वे स्टेशन हे काही युपी-बिहार किंवा उत्तर भारतासाठी लांब पाल्याच्या रेल्वे गाड्या सुटण्याचे रेल्वे स्थानक नाही.

जर स्वयंस्फुर्तीने जमाव जमलाच असता तर सीएसटी, दादर किंवा लोकमान्य टिळक टर्मिनल्सला जमायला हवा होता. परंतुतो बांद्रा रेल्वे स्टेशनवर जमवला गेला. आणि बारकाईने गर्दीचे फोटो पहा गांवी जाणाऱ्या कामगारांकडे बॅगा का नव्हत्या?. याचे उत्तर शोधायला हवे. हा जमाव जमवण्यामागे अद्रृश्य हात कुणाचे आहेत याचे उत्तर मिळायलाच हवे. एकिकडे महाराष्ट्र राज्य सरकार कोरोना प्रतिबंधाच्या बाबतीत उत्तम काम करत असताना व त्यासंबंधीची वाहवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना समस्त महाराष्ट्रप्रेमी जनतेकडून मिळत असताना, या सगळ्या प्रयत्नांना काळा डाग लागेल असा हेतू बाळगून जनतेमधे अफवा पसरवणारे झारीतले शुक्राचार्य कोण आहेत,याचा छडा लावायलाच हवा. क्षणिक राजकिय फायद्यासाठी महाराष्ट्राशी गद्दारी करणार्‍यांचा बुरखा टराटरा फाडायची वेळ आली आहे. आता यांना क्षमा नकोच.

आज सकाळी साडेअकरा वाजता ABP माझाचे पत्रकार कुलकर्णीने रेल्वे सुरु होणार अशा आशयाची बातमी दाखवली होती. आज जी काही बांद्रा रेल्वे स्टेशनवर हजारोंच्या संख्येने मजुरांची गर्दी जमली त्याला ही बेजबाबदार पत्रकारिता कारणीभूत असू शकते.म्हणून या घटनेची कसून चौकशी करुन अफवा पसरवल्या प्रकरणी यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. हे उघड आर एस एस प्रणित संस्था संघटनाचे काम आहे.या बाबत फडणवीस बेंबीच्या देठापासून बोंबलत आहे तिकडे शेलारमामा कर्तव्य भावनेने बांद्रा रेल्वे स्टेशनवर हजर होते. किरीट ला हि कंट फुटला. हजारो वर्षाची धर्मसत्ता धोक्यात आल्यामुळे ह्या लक्षवेधी घटना घडविल्या जात आहेत.

कोरोनामुळे हजारो वर्षाची धर्मसत्ता धोक्यात आली असे त्यांना का वाटते. कारण कोरोनाचे संकट देशावर दोन तीन महिने राहिल्यास तीन टक्के समाजाची रोजगार हमी आणि समाजात असलेली अदृश्य देवाची भिती मानवाच्या मनातून निघून जाईल. यांच्या विरोधात महात्मा ज्योतीराव फुले.पेरियार रामास्वामी नायकर यांनी अतिशय स्पष्ट शब्दात एकवेळा नाही तर हजारो वेळा प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी त्यावर अनेक पुस्तके लिहले.व्याखानाद्वारे प्रबोधन केले आहे. निसर्गाच्या नियमावर स्वतच्या मंत्राचे नियंत्रण आहे हे दाखवणारे आज निसर्गाच्या छोट्याश्या विषाणू समोर स्पेशल नापास झाले. त्यामुळेच आज प्रत्येक माणसा समोर एक अतिशय महत्वाचा प्रश्न उभा राहिला कि प्रत्येक गांवात मंदिर, मस्जिद,चर्च प्रत्येक धर्माची मंदिरे आहेत. पण एक हि सार्वजनिक दवाखाना नाही. त्यांची माणसाला किती गरज आहे. हे कोरोना महासंकटाने सर्वच देशाला दाखवून दिले.दोन तीन हजार लोकसंख्या असलेल्या पांच सहा गाव मिळून एक तरी सार्वजनिक दवाखाना अति आवशकता आहे. मंदिरे आहेत पण दवाखाना उभेच राहू दिल्या गेले नाहीत.किती मोठे षड्यंत्र आहे हे.

 मंदिराच्या उभारणी साठी सर्व गांवातील लोकांना एकत्र आणणारा भट,ब्राम्हण पुजारी सर्व संकटांना तोंड देण्यासाठी देवाचे मंदिर किती आवश्यक आहे हे पटुन सांगू शकतो.आणि स्वताच्या तीन टक्के समाजाची कायमस्वरूपी आर्थिकदृष्ट्या योजना यशस्वी पणे राबवितो. तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या दवाखान्याची परिस्थिती हि दयनीय असते.कोरोना सारखे महासंकट तालुक्यावर आले तर सरकारच्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडे नियंत्रण ठेवण्यासाठी कोणती हि उपाय योजना नाही.निसर्गाच्या आपत्कालीन परिस्थितीत विज्ञानवादी यंत्रणा कामा येऊ शकते,अज्ञानवादी, अंधश्रद्धावादी अतिभव्य मंदिर,मस्जिद चर्च कोणत्याही धर्माची प्रार्थनास्थळ तुमचे रक्षण करू शकत नाही.हे आज सिद्ध होत आहे. 

म्हणूनच तीन टक्के संख्या असलेला समाज देशातील असंघटित कष्टकरी कामगार मजुरांना रस्त्यावर उतरवण्यासाठी वेगवेगळ्या कुलापती काढत आहेत. मी कोणत्याही धर्माच्या विरोधात बोलत,लिहत नाही,तर निसर्गाच्या नियमांचे समर्थन करून विज्ञानाच्या कक्षा कशा प्रकारे वाढविण्यासाठी माणसांनी प्रयत्न केला पाहिजे हेच सांगण्याचा माझा खोटाटोप आहे.

सर्व धर्माच्या लोकांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे की कोणत्याही माणसांचा शारीरिक अपघात झाला,किंवा महिलांचे बाळंतपण, कोणाला ही ह्र्दय विकाराचा तिव्र झटका आला तर त्याला दवाखान्यात नेणे आवश्यक असते, तेव्हा त्याला मंदिर,मस्जिद,चर्च मध्ये नेल्या जात नाही. पण आपल्या मेंदूवर लहानपणापासून कोरून ठेवले असते की आपला रक्षण करणारा देव, अल्ला, गॉड आहे आणि तो मंदिरात, मस्जिद, चर्च मध्ये चोवीस तास साती दिवस हजर असतो.पण तो भट,ब्राम्हण,पुजारी,मौलवी,काझी,पाद्री, फादर यांच्या सांगण्या वरूनच मदत करण्यासाठी येतो. अन्यता नाही. यासाठी त्यांना मुक्तहस्ताने दान दिले पाहिजे. दक्षिणा, दानधर्म केला पाहिजे. आणि या दानधर्मा वर दक्षिणेवर तुमचा,सरकारचा अधिकारी नसतो, भट,ब्राम्हण,पुजारी यांचा जन्मसिद्ध अधिकार असतो. 22 मार्च पासुन देशातील सर्व मंदिरात,मस्जिद,चर्च चोवीस तास साती दिवस भक्तांच्या रक्षणासाठी हजर असलेले प्रार्थनास्थळ बंद आहेत.त्याला कारण वैधानिक आहे. त्यामुळेच भट,ब्राम्हण,पुजारी यांची हजारो वर्षांची धर्मसत्ता धोक्यात आली आहे.

वर्णव्यवस्थेचे समर्थन करणारे तीन टक्के समाजाचे लोक पोथी,पुराण, वेद, मनुस्मृती अशा धर्म ग्रँथाचा कायम हवाला देतात. पण ही लिहली कोणी त्यांच्या पूर्वजांनी नां?. लिहणारे ही तेच,वाचणारे ही तेच आणि सांगणारे ही तेच. त्याचं रितीरिवाज,परंपरा कायम ठेवून बहुसंख्य बहुजन समाजाचे धर्माच्या देवाच्या नांवा वर आर्थिक शोषण हजारो वर्षांपासून सुरू आहे. कोरोनाच्या महासंकटाने सर्वांचेच गोरख धंदे, बहुजन बहुसंख्य मागासवर्गीय ओबीसी, आदिवासी अल्पसंख्याक समाजाचे आर्थिक शोषण करणारे हड्डे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळेच हजारो वर्षांची धर्मसत्ता धोक्यात आली असे वाटत असल्यामुळे ते देशात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत

१८९७ च्या प्लेगच्या साथी पासुन मार्च २०२० च्या कोरोना महामारी पर्यंत कोणत्याही धर्माच्या देवांनी मंदिर,मस्जिद,चर्च यांनी माणसांचा बचाव करण्यासाठी काही केले नाही. भट,ब्राम्हण, पुजारी यांची हजारो वर्षांची धर्मसत्ता धोक्यात आली तेव्हा सर्वच सांगतात जमाना बदलला लोक सुशिक्षित झाल्यामुळे घोर पाप होत आहेत,घोर कलीयुग आला. देशात जगात लोकांना कायम मूर्ख बनविता येत नाही. परंतु धर्म अशी अदृश्य वस्तू आणि क्षेत्र आहे.की लोकांना पिढ्यानपिढ्या मूर्ख बनविण्यातआले,नी येते.पण कोरोना महासंकटाने भट, ब्राम्हण, पुजारी यांची हजारो वर्षांची धर्मसत्ता धोक्यात आली आहे.

हजारो वर्षांपासून धर्माच्या देवाच्या मंदिरावर वर्चस्व असणाऱ्यांची तरुण पिढी सुशिक्षित झाली आणि त्यांनी चॅनल,प्रिंट मीडियावर वर कब्जा मिळविला. चॅनल मीडिया, प्रिंट मीडिया चा मालक बनिया असेल पण संपादक,मुख्य कार्यकारी संपादक ब्राम्हणच असतो सर्वांनाच मी नालायक म्हणणार नाही काही अपवाद आहेत त्यांची जाहीर माफी मागतो, पण निसर्गाचा नियम आहे “गव्हा बरोबर खडे ही दळल्या जातात” त्याचं बरोबर काही लोक योग्य वेळी “जातीसाठी माती खातात” , एक मासुम गोरा गोमटा चेहरा असलेला मक्कार खोटा पत्रकार कोणत्याही आतंकवादी पेक्षा शंभर पटीने खतरनाक असतो.एक आतंकवादी एकाद्या ठिकाणी हल्ला करून पन्नास शंभर लोकांचा बळी घेऊ शकतो.पण एक मक्कार खोटा पत्रकार एकच वेळी देशातील लाखो लोकांच्या मध्ये दंगल घडवून देशाची कायदा सुव्यवस्था बिगडवून ठेऊ शकतो. दोन समाजात तेढ निर्माण करू शकतो, राजकीय समीकरण मोडून काढू शकतो.म्हणून सर्व सुजाण नागरिकांनी सावध असणे आवश्यक आहे. जमाव बंदी असतांना बांद्रा रेल्वे स्टेशन वर अचानक गोळा झालेली गर्दी वेळीच पोलिसांनी दक्षता घेतली म्हणून मोठा अनार्थ टळला अन्यता काय झाले असते?. म्हणूनच पाया खालील जमीन भुसभुशीत झाली आहे यांची जाणीव झालेले लोक काही ही करू शकतात. कोरोना महासंकटाने भट, ब्राम्हण, पुजारी यांची हजारो वर्षांची धर्मसत्ता धोक्यात आली आहे. म्हणून बहुसंख्य बहुजन मागासवर्गीय, ओबीसी आदिवासी अल्पसंख्याक समाजाने सावध राहावे. आणि कोरोना मुक्त व्हावे.तुम्ही सुरक्षित ते देश सुरक्षित.

सागर रामभाऊ तायडे,9920403859,भांडुप, मुंबई

Check Also

परिक्रमा औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील कु. देवयानी केदार वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

🔊 Listen to this   श्रीगोंदा ( प्रतिनिधी ) :- तालुक्यातील काष्टी येथील बबनराव पाचपुते …