Breaking News

पत्रकार बाळासाहेब नवगिरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ कारवाईसाठी नेवासा प्रेस क्लबच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

नेवासाफाटा ( प्रतिनिधी ) :- तालुक्यातील पानेगावचे पत्रकार व व जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब नवगिरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत हल्लेखोरांवर त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी करणारे निवेदन नेवासा प्रेस क्लबच्या वतीने तहसीलदार रुपेश सुराणा यांना देण्यात आले.
नेवासा तालुक्यातील पानेगाव येथील अवैध धंद्यांबाबत तसेच गावातील १७ कुटुंबांना होम कोरोंटाईन केले असल्या बाबत बातमी केल्याचा राग मनात धरून पत्रकार बाळासाहेब नवगिरे यांच्या घरावर संबधीत सुमारे १०० ते १२५ नागरिकांनी मोर्चा काढून नवगिरे यांना घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी रीतसर गुन्हा दाखल केला असून या घटनेचा नेवासा प्रेस क्लबच्या वतीने निषेध करून दोषींवर त्वरित कारवाई करावी या मागणीसाठी तहसिलदार रुपेश सुराणा यांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले.यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास पठाडे,संस्थापक अध्यक्ष गुरुप्रसाद देशपांडे,सचिव अशोक डहाळे उपस्थित होते.
निवेदनावर उपाध्यक्ष कैलास शिंदे,नानासाहेब पवार,शाम मापारी, सुधीर चव्हाण,रमेश शिंदे,ज्ञानेश्वर जाधव,संदीप वाखुरे, मकरंद देशपांडे, शंकर नाबदे, मोहन गायकवाड, पवन गरुड, अभिषेक गाडेकर यांच्या सह्या आहेत.

Check Also

संचारबंदी काळात बाहेर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

🔊 Listen to this   कर्जत (आशिष बोरा यांजकडून):-कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचे आदेशाने …