नेवासा (प्रतिनिधी) :- तालुक्यात मगाील दोन वर्षांपासून कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत असून, शेतक-यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या अळीचे समूळ नष्ट करण्याची आवश्यकता असून, कृषी विभाग व रासी सीड्स यांच्या संयुक्त विद्यमानातून बोंडअळी निर्मूलन मोहिमेचा शुभारंभ हिरवा झेंडा दाखवून कृषी अधिकारी मुरलीधर ठुबे यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समिती येथून करण्यात आला. त्यावेळी कृषी सहायक सुनील वाव्हळ,कदम साहेब,बापूसाहेब डिके,पुरोशत्तम दानवे ,संदीप केळगंद्रे , रासी सीड्सचे राम जाधव,निखिल नागे उपस्थित होते
यावेळी कृषी अधिकारी मुरलीधर ठुबे म्हणाले की ,बॉंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रासी सीड्सतर्फे विशेष मोहिम राबवली जात असून शेतक-यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले जात आहे सर्व शेतकऱ्यांनी या मोहिमेचा फायदा करून घेण्याचे आव्हान शेतीकार्याना केले व मोहिमेला शुभेच्छा दिल्या
Check Also
डहाणू भाजप कार्यालयावर सोशल डिस्टन्स चा फज्जा
🔊 Listen to this पालघर / डहाणू. (प्रतिनिधी) :– डहाणू येथील भारतीय जनता पक्षाचे जनसंपर्क …