
शिरसगांव (प्रतिनिधी):- येथील स्व सखाराम बाळा पाटील आगळे सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष दिपक सोपान आगळे पाटील यांची महाराष्ट्र राज्य एन. जी. ओ फेडरेशन च्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. हि निवड दिपक आगळे यांच्या कामाच्या बळावर व संघटनेच्या संचालक मंडळ श्री संजय पाटील. सौ.वैजंयतीमाला मद्दलवार.संतोष दगडगांवकर.औदुंबर काळे.संजय भोजणे. संचालक मंडळ बैठकीत सर्वनुमते निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य एन .जी .ओ फेडरेशन महाराष्ट्र च्या राज्यमध्ये.2 लाख 61 हजार 961 सामाजिक संस्था या एन. जी. ओ.फेडरेशन च्या संलग्न आहेत.
महाराष्ट्र राज्यातील सर्व सामाजिक संस्था या फेडरेशनच्या माध्यमातून फंन्डीग .अनुदान संस्थाना उपलब्ध करून देणे संस्थाना राज्य व केंद्र शासनाच्या योजना. नवीन प्रोजेक्ट रिपोर देणे. हि सर्व जबाबदारी अध्यक्ष म्हणुन दिपक आगळे पाटील यांना पार पाडावी लागणार असुन परिसरातुन त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात येत आहे.
खा.सुजय विखे पाटील. मा.ना. विठ्ठलराव लंघे पा. आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील व ज्ञानेश्वर स सा का. व्हाॅय चेअरमन देसाई आबा देशमुख व ज्ञानेश्वर स.सा.का.चे.संचालक श्री जनार्दन पटारे.आदी मान्यवरानी दिपक आगळे यांचे अभिनंदन केले.