
नेवासा ( प्रतिनिधी ):- नेवासा फाटा येथील समाज विकास समिती संस्थेच्या व्यवस्थापिका सिस्टर बिंदू या कोरोना महामारी आजाराची काळजी घेण्यासाठी समाज बांधवांना शासनाच्या नियम पाळण्याचे आवाहन करत आसून समाजातील गोरगरीब निराधार लोकांना आपल्या संस्थेमार्फत गरजेनुसार जिवनावश्यक वस्तू पुरवित आहेत. कोरोनामुळे गोरगरीबांच्या हाताला काम नाही. त्यामुळे अर्थिक संकटाचा सामना हातावर पोट आसणाऱ्या दीनदुबळ्या लोकांना कोरोनाच्या संकटात भोगावा लागत आसल्याने समाज विकास समिती या संस्थेच्या माध्यमातून गोरगरीबांना आधार देण्याचे काम होत आसल्याने सिस्टर बिंदू यांच्या उपक्रमाचे मोठे कौतूक होतांना दिसून येत आहे.
नेवासा फाटा येथे समाज विकास समितीचे मुलींचे वसतीगृह आसून दीनदुबळ्या लोकांच्या मुली या वसतीगृहात शिक्षण घेत आसतात.त्यामुळे त्यांना गोरगरीबांच्या समस्यांची मोठी जाण आसून कोरोना आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या झपाट्याने वाढत आसल्याने सर्वञ संचारबंदी लागू करण्यात आलेली आसल्यामुळे कामधंदा नसणारी घरात बसून राहणारी समाजातील दीनदुबळी जनतेला दोन वेळच्या दोन घास अन्नाची मोठी चिंता पडली आहे.त्यामुळे सिस्टर बिंदू या समाज विकास समितीच्या माध्यमातून काही गोरगरीबांना मायेचा आधार देत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कोरोनाच्या संकटात करुन निराधारांना आधार देण्याचे काम या संस्थेकडून होत आसल्याने समाज विकास समितीच्या व्यवस्थापिका सिस्टर बिंदूच्या मदतीने गोरगरीब लोक भारावून जातांना दिसून येत आहेत.